Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्याप्रकरणात राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स सांगितलंय.
Rahul Gandhi:  हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स
Rahul Gandhi
Published On

काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदमानीकारण विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आलेत.

सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. सात्यकी सावरकर यांनी एप्रिल २०२३ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० ​​अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केला होता आणि शहर न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणात न्यायालयात हजर होण्याबाबत गांधी यांना बजावलेले समन्स चुकीच्या न्यायालयात गेल्याने परत आले होते. आता न्यायालयात हजर होण्याबाबत बजावलेले समन्स अखेर राहुल गांधींच्या घरी पोचलं असून ते त्यांनी स्वीकारलंय. आधी चुकीच्या न्यायालयात गेलेले समन्स दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात गेले आहे.

परंतु राहुल गांधी यांचे निवासस्थान तीस हजारी न्यायालयाच्या हद्दीत असल्याने समन्स बजावण्यासाठी कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात केली जाणार होती.अखेर नव्याने पाठवलेले समन्स गांधी यांची घरी पोचले असून ते त्यांनी स्वीकारले देखील आहे.

गांधी यांच्यावर दाखल असलेल्या दाव्याची सुनावणी आजी-माजी खासदार-आमदारांविरोधात खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होत आहे. त्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हाजीर होण्याचे समन्स बजावले आहे. या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

तक्रारीनुसार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात दावा केला होता की, सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले होते की, त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकर त्यामुळे खूश होते. राहुल गांधी यांच्या या आरोपावर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर म्हणाले, अशी कोणतीही घटना घडली नव्हती. सावरकरांनी असे कुठेही लिहिले नव्हते. राहुल गांधी यांचे हे विधान काल्पनिक, खोटे आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com