गिरीश कांबळे, साम टीव्ही
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. विधानसभ निवडणुकीच्या प्रचाराला दोन दिवस राहिल्याने राजकीय पक्षांची लगबग सुरु झाली आग. आजच्या 'सुपरसंडे'ला मुंबईत महाविकास आघाडीने जाहीर सभा आयोजित केली. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर जोरदार हल्लाबोल केला. 'मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या अशा बातम्या येतील. या तोफा महाविकास आघाडीकडे आहेत. महाझुटी आघाडीकडे थापा आहेत. महाझुटी आघाडी २३ तारखेनंतर नाहीशी होणार आहे.
ते कोणत्या तोंडाने काय बोलतात त्यांना कळत नाही. प्रत्येक वचनाला आमची एक पार्श्वभूमी आहे.
माझ्या वडिलांना आणि आजोबांना शाळेची फी भरायला पैसे नव्हते, पण सातवीत शाळा सोडावी लागली. अशा अनेक मुलांना राज्यात शाळा शिकता येत नाहीये. त्यामुळे मुलींसोबत मुलांना मोफत शिक्षण देणार आहे.
राज्यातील लढाई कोण जिंकणार? महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्र प्रेमी जिंकणार? छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा जिंकणार की मोदी-शहा-अदानी यांचा नोकर जिंकणार ही ठरवणारी निवडणूक आहे.
आमचा मुंबई तोडण्याचा अपप्रचार नाही. या सरकारला मुंबईचा जीडीपी वाढवायचा आहे. जीडीपी वाढवण्यासाठी मुंबई मोठमोठ्या बिल्डर्सना द्यायची आहे आणि द्यायला सुरुवात झाली आहे.
मुंबई स्वायत्त आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यांना मुंबईचं महत्व मारुन टाकायचं आहे. त्यांना केंद्रशासित करता येत नाही. तोडण्याची भाषा करता येत नाही.
मुंबईची ब्ल्यू प्रिंट निती आयोगामार्फत तयार करण्यात आली आहे. त्यात मुंबई महापालिकेचं महत्व पूर्ण मारून टाकले आहे.
मी मुख्यमंत्री असताना अशी कोणाची हिंमत झाली नव्हती. पंतप्रधान मोदींना अनसेफ वाटत असेल तर पहिला राजीनामा द्या
शिवसेनेत तर तुम्हाला घेणार नाही, पण शिवसेना कशी काम करते बघत रहा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.