Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Devendra Fadnavis Rally: देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेतून मविआच्या जाहीरनाम्यावर टीका केलीय. त्याचवेळी त्यांनी महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. मात्र नागरिकांनी त्यांच्या भाषणाकडे पाठ फिरवली.
Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ
Devendra Fadnavis News: Saam tv
Published On

तरबेझ शेख, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतली. महाविकास आघाडीने सोयाबीन उत्पादकांना एका क्विंटलमागे ७ हजारांचा भाव देऊ, असे आश्वासन दिले आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला खरा पण महिलांनी मात्र देवाभाऊच्या सभेकडे पाठ फिरवली. नागरिक सभा सोडून जात असल्याचं दिसताच फडवणीसांनी सभा आटोपती घेतली.

नाशिकच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील नागरिक उठून जात असल्याने फडणवीसांनी सभा आटोपली. देवेंद्र फडणवीस यांचा भाषण सुरू असताना महिला निघून जात होत्या. गर्दी कमी होत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली आटोपती घेतली. दरम्यान सभेसाठी गर्दी होत नसल्याने देवेंद्र फडणवीस मंचावर उशिराने आले होते. कसे बसे नागरिक जमल्यानंतर फडवणीस भाषणासाठी उभे राहिले.

मात्र बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या देवाभाऊच्या सभेकडे बहिणींनी पाठ फिरवली. गर्दी जमविण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठी धावपळ झाली होती. गर्दी निघून जात असल्याने २२ मिनिटातच फडणवीस यांनी आपले भाषण आवरले.

सोयाबीन खरेदीवरून देवेंद्र फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

महाविकास आघाडीने सोयाबीन उत्पादकांना दिलासा देत एका क्विंटलमागे ७ हजारांचा भाव देऊ, असे आश्वासन दिले. मात्र यावरून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली. दरम्यान सरकारने आता सोयाबीनची खरेदी सहा हजार रुपये हमीभावाने करण्याचं ठरवलं आहे.

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ
Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

कालच केंद्र सरकारने आदेश काढलाय की, १२ टक्क्याने ऐवजी १५ टक्क्यांपर्यंतचं मॉइश्चर सोयाबीन पिकासाठी ग्राह्य केलाय. फडणवीस यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. सरकारने 14000 मॅगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प काम सुरू केलं. 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यावर मुबलक प्रमाणात वीज मिळेल.

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ
Sharad Pawar: सगळ्यांचा नाद करा पण शरद पवारांचा नाद करू नका, पवारांचं महायुतीला आव्हान

आमचं सरकार पुन्हा आल्यास आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल. प्रत्येक समाजाकरिता वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने केल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com