Ranveer Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh : 'बेबी सिंबा'चा पहिला चित्रपट, दीपिकाच्या मुलीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, रणवीरकडून खुलासा

Baby Simba : 'सिंघम अगेन'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला रणवीरने हजेरी लावली आणि आपल्या मुलीबाबत छान वक्तव्य केलं आहे. काय? जाणून घ्या.

Shreya Maskar

नुकताच रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन'चा (Singham Again) ट्रेलर लाँच सोहळा पार पडला आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण, रणवीर सिंग (Ranveer Singh ), करिना कपूर आणि अजय देवगणची दमदार भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लाँच मुंबईत पार पडला आहे. दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे पावर कपल आहेत. दोघांनीही अनेक हिट चित्रपट केले आहेत.

ट्रेलर लाँचच्या वेळी रणवीरने सांगितलं की, हा चित्रपट त्याच्या मुलीचा पहिला चित्रपट आहे. कारण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका (Deepika Padukone) प्रेग्नेंट होती. म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये दीपिका चित्रपटाचे शूटिंग केलं होतं. त्यामुळे "मा‍झ्या मुलीने बेबी सिंबाने (Baby Simba) 'सिंघम अगेन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. असे रणवीर बोलतो. " पुढे रणवीर बोलला की, "दीपिका घरी बाळासोबत आहे. त्यामुळे ती ट्रेलर लाँचला येऊ शकली नाही. माझी रात्रीची ड्युटी आहे. तसेच रणवीरने एका अनोख्या शैलीत प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला "लेडी सिंघम, सिम्बा आणि बेबी सिम्बाकडून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!"

दीपिका सिंघम अगेनमध्ये शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे. जी कॉप युनिव्हर्सची महिला आहे. हा ॲक्शनचा धमाका आहे. तर रणवीर सिंबाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार यांची देखील दमदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

Low Heart Rate: लो हार्ट रेटमुळे ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो का? ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT