Emraan Hashmi injured : इमरान हाश्मीला गंभीर दुखापत,काय घडलं नेमकं?

Emraan Hashmi : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशात त्याचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
Emraan Hashmi
Emraan Hashmi injured SAAM TV
Published On

बॉलिवूडचा सुपरस्टार इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्याने अनेक हिट चित्रपट केले आहेत. आता इम्रान हाश्मीला चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाली आहे. त्याच्या मानेला इजा झाली आहे. इम्रान हाश्मीचा मानेला लागलेला फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इम्रानचा अपघात झाल्यामुळे चाहेत देखील चिंतित आहेत.

इमरान हाश्मी हैदराबादमध्ये 'गोदाचारी 2' चित्रपटाचे शूटिंग करत होता. या शूटिंग दरम्यान त्याला दुखापत झाली आहे. जो 2018 च्या तेलगू ॲक्शन स्पाय थ्रिलरचा सीक्वल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ॲक्शन सीन करताना इमरानच्या मानेला दुखापत झाली आहे. इमरानच्या उजव्या जबड्याच्या खाली एक मोठा कट झाला आहे. इमरानला दुखापत झाल्यास त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. त्यांच्या जखमेवर ड्रेसिंग करण्यात आले. इमरानचा मोठा अपघात होण्यापासून वाचला. 'गोदाचारी २' हा इमरान हाश्मीचा दुसरा तेलुगू चित्रपट आहे.

इमरान हाश्मी लवकरच 'गोदाचारी 2'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इमरान हाश्मीची 'टायगर 3' मधील भूमिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली आहे. या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. 'टायगर 3' चित्रपट खूप गाजला होता. इमरानचे मर्डर , हमारी अधुरी कहाणी, राझ ३, वन्स अपॉन टाइम इन मुंबई आणि टायगर ३ हे चित्रपट खूप गाजले आहेत. इमरानने 'फूटपाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इमरानला खरी लोकप्रियता 'मर्डर' या चित्रपटातून मिळाली.

Emraan Hashmi
Mitali Mayekar : 'रिॲलिटी शो आहे की...' मिताली मयेकरचा सूरजला टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com