हैद्राबादमध्ये एक खळबळजनक घटना घडलीय. तेलुगू सुपरस्टार नागार्जुनच्या सेंटर हॉलवर हैद्राबादच्या डिझास्टर रिस्पॉन्स अँड असेट्स मॉनिटरिंग अँड प्रोटेक्शन यांच्याकडून कारवाई करण्यात आलीय. सुपरस्टार नागार्जुन याच्या एन कन्व्हेन्शन सेंटरवर बुलडोझर चालवणात आलाय. नागार्जुचं हे एन कन्व्हेन्शन सेंटर 10 एकर जागेत पसरलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सेंटरची चौकशी सुरू होती. एन कन्व्हेन्शन सेंटर मधापूर भागातील थम्मीदीकुंता तलावाच्या बफरच्या झोनमध्ये होते.
हायद्रानं २४ ऑगस्ट रोजी या सेंटरवर बुलडोझरनं कारवाई केली. मधापूरच्या पोलीस स्थानकामधून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईच्यादरम्यान त्या जागी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कन्व्हेन्शन हॉल त्या एरियामधील 2 एकर बफर झोनमध्ये होता. माहितीनुसार यापूर्वी देखील अधिकाराचा गैरवापर करत ग्रेटर हैदराबाद नगर निगमला या हॉलवर कारवाई करण्यापासून रोखण्यात आलं होतं.
एन कन्व्हेन्शन सेंटर या प्रकरणातील तक्रारदार भास्कर रेड्डी यांनी सेंटर पाडण्याचे आणि या भागातील तलाव पुन्हा खुला करण्यात यावा, अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती. या प्रकरणातील कारवाई दरम्यान त्या परिसरातील आजूबाजूचा आणि तलावाच्या दिशेनं जाणारा रस्ता देखील बंद करण्यात आला होता. या सेंटरचे मालक नागार्जुन तेलुगू इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यावरोबर नागार्जुन यांचा अनेक क्षेत्रांमध्ये प्रभाव आहे.
राजकीय सभा आणि अभिनेत्यांच्या लग्नासाठी या हॉलचा वापर केला जात होता. सेंटरचा तलावासारख्या नैसर्गिक जलस्रोताला फटका बसतो आहे, असं तपासणीमध्ये आढळलं आहे. त्यामुळे या सेंटवर बुलजोझर चालवण्यात आला होता. तेलुगु सुपरस्टार नागार्जुन याने आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नागार्जुनने 967 सालीच बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत त्याचं पहिलं पाऊल टाकलं होतं.
Edited By: Nirmiti Rasal