Anushka Sharma's Heartfelt Post For Virat Kohli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma Post : निवृत्तीच्या घोषणेनंतर अनुष्का शर्माची विराटसाठी खास पोस्ट, लेक माहिकाला वाटतेय एका गोष्टीची काळजी

Anushka Sharma's Heartfelt Post For Virat Kohli : विराट कोहलीने हा सामना जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे.

Chetan Bodke

टीम इंडियाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. एकवेळ हा सामना दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकणार असं सर्वांनाच वाटत होतं. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढलं. टी-२० विश्वचषक स्पर्धेत ट्रॉफी जिंकल्यानंतर अवघ्या देशाने टीम इंडियाचे कौतुक केले. या ऐतिहासिक विजयानंतर क्रीडासह राजकीय आणि मनोरंजन विश्वातील दिग्गजांनी टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिनेही पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं कौतुक केलं. विराट आणि रोहितने हा सामना जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे या दोघांसाठीही हा क्षण भावुक होता. भारतीय संघातील खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहून अनुष्काची लेक माहिकालाही एका गोष्टीची काळजी वाटली. ही गोष्ट अनुष्काने पोस्टमधून सांगितले आहे…

"आजचा टी- २० विश्वचषक सामना संपल्यानंतर माहिकाने टीव्हीवर टीम इंडियाला रडताना पाहिलं. "त्यांना तिथे धीर देण्यासाठी कोण असेल ?" असा प्रश्न मला विचारला. "हो डार्लिंग... कारण १.५ बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे." असं मी तिला म्हणाले. टीम इंडियाने आजच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. चॅम्पियन्स... अभिनंदन !" अशी पोस्ट अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.

तर दुसरी पोस्ट खास विराटसाठी शेअर केलेली आहे. "मी या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करते. विराट कोहली तु माझा आहेस, हे सांगताना मला खूप आनंद होतोय. जल्लोष साजरा करण्यासाठी येताना माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये" अशी कॅप्शन अभिनेत्रीने दिलेली आहे. पोस्टमध्ये विराट कोहलीच्या हातात ट्रॉफी उंचावताना दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या दोन्हीही पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT