Dashavatar  saam tv
मनोरंजन बातम्या

Dashavatar : कोकणातला 'दशावतार' ऑस्करला पोहचला, जगभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

Dashavatar-Oscar : 2025 ला रिलीज झालेला 'दशावतार' हा मराठी चित्रपट आता ऑस्करला गेला आहे. जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत झळकले.

Shreya Maskar

'दशावतार' चित्रपट आजही जगभरात गाजत आहे.

'दशावतार' आता ऑस्करला पोहचला.

दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने 'दशावतार' चित्रपटाला चारचाँद लागले.

सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' (Dashavatar ) चित्रपटाने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. 'दशावतार' चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत जेष्ठ मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar ) झळकले आहेत. 'दशावतार' चित्रपटातून कोकणातील एक परंपरा आणि लोककला दाखवण्यात आली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी 'दशावतार' चित्रपटात बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे.

मराठी मनोरंजन सृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आह. जगभर गाजलेला 'दशावतार' हा मराठी चित्रपट आता ऑस्करला गेला आहे. ही आनंदाची बातमी चित्रपट दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. 98 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत 'दशावतार' चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. "हजारो चित्रपटातून जे १५०+ चित्रपट निवडले गेलेत त्यातला हा एकमेव मराठी चित्रपट आहे..." असल्याचे सुबोध खानोलकरांनी सांगितले आहे.

सुबोध खानोलकरांनी केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. शुभेच्छांचा आणि कौतुकाचा पाऊस पडत आहे. त्यांनी या पोस्टला खूपच सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिल्यानुसार, "'दशावतार' ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत निवडला गेल्याचा त्यांना मेल आला. मुख्य स्पर्धेच्या कॅटेगिरीत निवडला गेलेला 'दशावतार' हा बहुदा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हजारो चित्रपटातून जे १५०+ चित्रपट निवडले गेलेत त्यातला हा एकमेव मराठी चित्रपट आहे आणि Academy Screening Room मध्ये दाखवला जाणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे..."

'दशावतार' चित्रपटाने 2025 ला बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'दशावतार' चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे, सुनील तावडे आणि विजय केंकरे या कलाकारांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर गाजत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matki Bhaji Recipe: मोड आलेल्या मटकीची गावरान स्टाईल भाजी कशी बनवायची?

Valachya Shenganchi Bhaji : विदर्भ स्टाइल झणझणीत वालाच्या शेंगाची भाजी, मुलांना टिफिनला आवर्जून द्या

Maharashtra Live News Update: पुण्यातील वन विभागासमोर जनशक्ती शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण सुरू

अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट; जवानांच्या शक्तिप्रदर्शनाने देशभक्तीचा जल्लोष|VIDEO

Valentine Day Love Letter: 'स्वप्न राहील अपुरे तुजवीण सख्या रे'; मनातील तळमळ बोलू कशी?

SCROLL FOR NEXT