Jitendra Joshi : "जर हीच प्रसिद्धी त्यावेळी..."; जितेंद्र जोशीनं व्यक्त केली 'काकण' चित्रपटाबद्दलची खंत, पाहा VIDEO

Jitendra Joshi Talk On Kaakan Movie : नुकत्याच झालेल्या मिडिया मुलाखतीत अभिनेता जितेंद्र जोशी 'काकण' चित्रपटाबद्दल भरभरून बोलला. त्याने एक खंत देखील व्यक्त केली आहे.
Jitendra Joshi Talk On Kaakan Movie
Jitendra Joshisaam tv
Published On
Summary

जितेंद्र जोशीचा नुकताच 'मॅजिक' चित्रपट रिलीज झाला आहे.

जितेंद्र जोशीने 'काकण' चित्रपटाबद्दल खंत व्यक्त केली आहे.

'मॅजिक' चित्रपट 1 जानेवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी सध्या त्याच्या 'मॅजिक' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट 1 जानेवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांना जितेंद्र जोशीचा अभिनय खूप आवडला आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र जोशीने नुकतीच सकाळ प्रीमियरला मुलाखत दिली. ज्यात तो 'काकण' चित्रपटाबद्दल भरभरून बोलला.

मराठी चित्रपट 'काकण'ला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज सोशल मीडियावर 'काकण'ची हवा पाहायला मिळते. मुलाखतीत मात्र जितेंद्र जोशीने 'काकण' चित्रपटाविषयी खंत व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, "पूर्वीचे जे चित्रपट आहेत त्यांनी आता हळूहळू लोकांच्या मनात घर केली आहेत. 'काकण' तेव्हा नव्हता चालला मात्र आता तो सोशल मीडियावर हळूहळू Grow होत आहे. जर हीच प्रसिद्धी त्यावेळी मिळाली असती तर चित्रपटाचे निर्माते सचिन शिंदे त्यांच भलं झालं असतं..."

पुढे जितेंद्र जोशी म्हणाला की, "आज ना उद्या नटांचं/ कलाकारांचं भलं होतच. त्यांना फायदा होतोच. पण निर्मात्याला नाही होत. जर चित्रपट तेव्हा चालला असता तर सचिन शिंदेला नक्कीच चार पैसे जास्त मिळाले असते. त्या वेळी चाललं तर निर्मात्याचं भलं होत. चित्रपट आज ना उद्या कधीतरी वर येणार. जर तुमची कामा प्रति निष्ठा आणि प्रेम असेल तर ते एकदिवस यश मिळते. जे अस्सल आहे ते टिकेल..."

'काकण' चित्रपट

'काकण' हा मराठी चित्रपट 2015 ला रिलीज झाला. 'काकण' चित्रपटाचे निर्माते सचिन शिंदे आहेत. 'काकण' ही एक हृदयस्पर्शी लव्ह स्टोरी आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत जितेंद्र जोशी आणि उर्मिला कोठारे झळकली आहे. आज हा चित्रपटातील संवाद आणि गाणी तुफान गाजत आहेत.

Jitendra Joshi Talk On Kaakan Movie
Abhinay Berde- Laxmikant Berde : वडिलांकडून 'ही' गोष्ट शिकायची राहून गेली, अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल नेमकं काय बोलला? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com