Dashavatar Collection : 'दशावतार'ची उंच भरारी, दिलीप प्रभावळकर यांच्या चित्रपटानं पार केला तब्बल 'इतक्या' कोटींचा टप्पा

Dashavatar Box Office Collection Day 10 : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार' ची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चित्रपटाने दहा दिवसांत १५ कोटींचा टप्पा पार केला आहे.
Dashavatar Box Office Collection Day 10
Dashavatar CollectionSAAM TV
Published On
Summary

'दशावतार' चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे.

'दशावतार'ने दहा दिवसांत 15 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'दशावतार'मध्ये जेष्ठ मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर झळकले आहेत.

सध्या सर्वत्र 'दशावतार' (Dashavatar) ची हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटाचे शूटिंग कोकणात झाले आहे. 'दशावतार' चित्रपट सुबोध खानोलकर दिग्दर्शित आहे. 'दशावतार' चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत जेष्ठ मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar ) झळकले आहेत. त्यांचा अभिनय आणि लकू पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चित्रपटाने दहा दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'दशावतार' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार' चित्रपटाने रिलीजच्या दहाव्या दिवशी दुसऱ्या रविवारी तब्बल 3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 10 दिवसांत चित्रपटाने एकूण 15.85 कोटी रुपये कमावले आहे. 'दशावतार' ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे. लवकरच हा चित्रपट आता 20 कोटींचा टप्पा देखील पार करेल.

  • दशावतार दिवस पहिला - 58 लाख रुपये

  • दिवस दुसरा - 1.4 कोटी रुपये

  • दिवस तिसरा - 2.4 कोटी रुपये

  • दिवस चौथा -1.1 कोटी रुपये

  • दिवस पाचवा -1.25 कोटी रुपये

  • दिवस सहावा -1.3 कोटी रुपये

  • दिवस सातवा - 1.15 कोटी रुपये

  • दिवस आठवा - 1 कोटी रुपये

  • दिवस नववा - 2.65 कोटी रुपये

  • दिवस दहावा - 3.00 कोटी रुपये

  • एकूण - 15.85 कोटी रुपये

'दशावतार' स्टार कास्ट

'दशावतार' चित्रपटातून कोकणातील एक परंपरा आणि लोककला दाखवण्यात आली आहे. 'दशावतार' चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे, सुनील तावडे आणि विजय केंकरे या कलाकारांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.

'दशावतार'चे तगडे प्रमोशन करण्यात आले होते. कलाकार चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांची भेट घेत होते. 'दशावतार'ची क्रेझ फक्त भारतात नसून परदेशातही पाहायला मिळाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी 'दशावतार'चे कौतुक केले आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे.

Dashavatar Box Office Collection Day 10
Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई झाला बिझनेसमन; मुंबईत सुरू केलं रेस्टॉरंट, पाहा पहिली झलक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com