Danka Hari Namacha Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Danka Hari Namacha Trailer : आषाढीच्या पार्श्वभूमीवर ‘डंका हरी नामाचा’ वाजणार... धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Danka Hari Namacha Trailer Released : ‘डंका… हरीनामाचा’ हा चित्रपट १९ जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीवर आधारित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Mohini Sonar

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांच्याप्रति भक्तीचं उदाहरण प्रकट करण्यासाठी हा चित्रपट असेल. रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओजकडून हा चित्रपट प्रस्तुत केला जाईल. ‘डंका… हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला थेटरमध्ये दाखवला जाईल. रविंद्र फड याची निर्मिती करत आहे. तर या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक श्रेयश जाधव आहेत.

या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच नुकताच करण्यात आला . चित्रपटाचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी त्यांच्या विठ्ठलाप्रती असलेल्य भक्तीशी निगडीत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल’, असा विश्वास निर्माते रविंद्र फड व दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी व्यक्त केला.एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद कलाकारांनी व्यक्त केला.

हरिपूर या छोट्याशा खेड्याची ही गोष्ट आहे. तिथली विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेल्यांनतर नेमकं काय होतं ते दाखवणारा हा चित्रपट आहे. वारकऱ्यांसाठी खरं तर ही पर्वणीच म्हणावी लागेल. दरम्यान विठ्ठलाची मूर्ती शोधण्याची मोहीम काही गावकरी हाती घेतात.

ही मूर्ती नेमकी कोणाकडे असते? गावकरी ही मूर्ती मिळवण्यात यशस्वी होणार का? याची धमाल मनोरंजक कथा दाखवतानाच विठ्ठलाच्या भक्तीचा साक्षात्कार होऊन गावकरी विठूरायाशी कसे एकरूप होतात हे ‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या कथेला साजेशी गाणीही चित्रपटात आहेत. सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव हे सगळे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळतील. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हा चित्रपट कसा असेल हे पाहवं लागणार आहे.

कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. या चित्रपटात कॉस्ट्यूम्सची जबाबदारी सानिया देशमुख आणि साहस दृश्ये, परमजीत सिंह ढिल्लोन यांच्याकडे आहे. तर म्यूजिक अभिनय जगताप यांनी दिलंय. कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT