Armaan Malik Slap Vishal Pandey : अरमान मलिकने विशाल पांडेच्या कानशि‍लात लगावली, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

Bigg Boss OTT 3 Armaan Malik Vishal Pandey Fight : गेल्या काही दिवसांपूर्वी कंटेस्टंट विशाल पांडे याने कृतिकाबद्दल एक कमेंट केली होती. तिने त्या कमेंटचा खुलासा सर्वांसमोर करत विशालवर काही गंभीर आरोप केले आहेत.
Bigg Boss OTT 3 News
Bigg Boss OTT 3 Armaan Malik Vishal Pandey FightSaam Tv

‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. शो सुरू होऊन १५ दिवस झाले असून प्रेक्षकांकडून या शोला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी घराबाहेर गेलेली पायल मलिक पुन्हा एकदा शोमध्ये एका दिवसासाठी आली होती. तिच्या परत येण्याने ‘बिग बॉस’च्या घरातलं वातावरण आणखी तापलंय.

Bigg Boss OTT 3 News
Kushal Badrike Post : “हिंदी म्हणजे आयुष्यात...”, ‘मॅडनेस मचाएंगे’ बंद होण्यापूर्वी कुशल बद्रिकेने शेअर केली खास पोस्ट

गेल्या काही दिवसांपूर्वी कंटेस्टंट विशाल पांडे याने कृतिकाबद्दल एक कमेंट केली होती. तिने त्या कमेंटचा खुलासा सर्वांसमोर करत विशालवर काही गंभीर आरोप केले आहेत. त्याने केलेली कमेंट ऐकून युट्यूबर अरमान मलिक चांगलाच भडकला आहे. व्हायरल होत असलेल्या टीझरमध्ये विशाल पांडेने कृतिकाविषयी कमेंट काय केली आहे. पायलनेही त्या व्हिडिओमध्ये विशालवर आरोप केले आहेत.

"वीकेंड का वार"मध्ये पायल मलिक शोमध्ये एका दिवसासाठी विशालचं सत्य सगळ्यांसमोर उघड करण्यासाठी आली होती. विशालने कृतिकाबद्दल केलेल्या कमेंटबद्दल सगळ्यांना सांगितला आणि आरोप केले. ती म्हणाली, “विशाल, कृतिकाकडे वाईट नजरेने पाहतो. विशाल ऑन कॅमेरा एक अशी गोष्ट बोलला आहे, जी माझ्यामते खूप वाईट आणि चुकीची आहे.” विशालने लवकेश कटारियाच्या कानात “भाभी अच्छी लगती है” असं सांगितलं होतं. “त्यामागचा माझा हेतू चुकीचा नव्हता” असं घटनेचं स्पष्टीकरण देताना विशालने सांगितलं.

Bigg Boss OTT 3 News
Dharmaveer 2 Teaser : 'धर्मवीर २'चा दमदार टीझर रिलीज, पाहायला मिळतेय धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाची झलक

या प्रकरणावर अनिल कपूर भडकला होता. "वीकेंड का वार"मध्ये अनिल कपूर विशालला प्रश्न उपस्थित करत म्हणाले, “जर तुझा हेतू चुकीचा नव्हता तर तू लवकेशच्या कानात का बोललास?” पण या प्रश्नाचं उत्तर विशालकडे नव्हतं. पायलने "वीकेंड का वार"मध्ये केलेल्या या खुलासामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं. विशाल आणि अरमानमधील वाद चांगलाच विकोपाला गेला. रागामध्ये अरमानने विशालच्या कानशिलात दिली होती. त्यानंतर विशालही चिडला आणि तो अरमानच्या अंगावर धावून गेला. पण घरातल्या सदस्यांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सध्या सोशल मीडियावर "वीकेंड का वार"चा टीझर तुफान व्हायरल होत आहे.

Bigg Boss OTT 3 News
Sonakshi Sinha On Pregnancy Rumours : सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, लग्नानंतर सांगितलं मोठं सत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com