Sonakshi Sinha On Pregnancy Rumours : सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, लग्नानंतर सांगितलं मोठं सत्य

Sonakshi Sinha Addressed Pregnancy Rumours : लग्नाच्या काही दिवसानंतर सोनाक्षी आणि झहीर रुग्णालयाच्या बाहेर एकत्र स्पॉट झाले. सोशल मीडियावर अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. पण आता या चर्चांवर खुद्द सोनाक्षीने प्रतिक्रिया दिलेली आहे.
Sonakshi Sinha On Pregnancy Rumours : सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, लग्नानंतर सांगितलं मोठं सत्य
Sonakshi Sinha Addressed Pregnancy RumoursSaam Tv

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने २३ जूनला मुंबईमध्ये रजिस्टर्ड मॅरेज केलं. त्यानंतर मित्र मंडळींसाठी आणि फॅमिली फ्रेंड्ससाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. लग्नानंतर सोनाक्षी- झहीर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. लग्नाच्या काही दिवसानंतर सोनाक्षी आणि झहीर रुग्णालयाच्या बाहेर एकत्र स्पॉट झाले. तेव्हापासून सोशल मीडियावर अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची सुरु झाली आहे. पण आता या चर्चांवर खुद्द सोनाक्षीने प्रतिक्रिया दिलेली आहे.

Sonakshi Sinha On Pregnancy Rumours : सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, लग्नानंतर सांगितलं मोठं सत्य
Kailash Kher Birthday : वयाच्या १४ व्या वर्षी सोडलं घर, मग बनले जगप्रसिद्ध गायक, कैलाश खेर यांचा थरारक प्रवास

सध्या सोनाक्षी तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. लग्नानंतर तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. हॉरर कॉमेडी 'काकूडा' झी ५ वर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सोनाक्षीला "तुझं लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे ?" असा प्रश्न विचारला होता. यावर तिने सांगितले की, "जसं मला लग्नाच्या आधी वाटायचं तसंच लग्नाच्या नंतरही वाटतंय. लग्नाच्या आधीचं आयुष्य खूप सुंदर होतं. लग्नाआधीचं माझं आयुष्य सेट असल्यामुळे मी आनंदी आहे. आता मी पुन्हा एकदा कामाला नव्याने सुरुवात केली आहे. त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे."

सोनाक्षीने प्रग्नेंसीवरही भाष्य केलं आहे. ती म्हणाली, "लग्नानंतर फक्त मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. जर का गेले तर लगेच मी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू होतील. फक्त इतकाच बदल लग्नानंतर झालेला आहे." दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर दोघेही शत्रुघ्न सिन्हा यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. गेल्या ७ वर्षांपासून सोनाक्षी आणि झहीर रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा हे कपल कॅमेऱ्यासमोर एकत्र स्पॉट झालेलं आहे. पण त्यांनी केव्हाच आपलं नातं लपवलं नाही. सोनाक्षीमध्ये आणि झहीर इक्बालमध्ये एक वर्षांचा फरक आहे. सोनाक्षीहून झहीर एक वर्षाने लहान आहे.

Sonakshi Sinha On Pregnancy Rumours : सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, लग्नानंतर सांगितलं मोठं सत्य
Anant- Radhika Sangeet Ceremony : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात नीता अंबानी स्टेजवर रोहितला मिठी मारली आणि रडल्या; नेमकं कारण काय?

दोघांनीही डबल XL चित्रपटात एकत्र काम केले आहे. सलमान खाननेच झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'नोटबूक' चित्रपटातून झहीरने पदार्पण केलं होतं. पण तो चित्रपट फ्लॉप ठरला. झहीरचे वडील सराफ व्यापारी आहेत, त्यामुळे त्यांची आणि भाईजानची ओळख फार जुनी आहे. सलमान खानमुळे सोनाक्षी आणि झहीरची भेट झाली होती. तेव्हापासून त्यांची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता त्या प्रेमाचं रुपांतर लग्नात झाले.

Sonakshi Sinha On Pregnancy Rumours : सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, लग्नानंतर सांगितलं मोठं सत्य
Ranbir Kapoor : बालपणीच्या कोणत्या आठवणीमुळे रणवीर कपूर आजही होतो डिस्टर्ब ? स्वत:च केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com