CID  SAAM TV
मनोरंजन बातम्या

दया दरवाजा तोड दो! CID चा मुहूर्त ठरला; चोर पोलिसांचा खेळ पुन्हा सुरू,कधी अन् कुठे पाहा

CID Season 2 : सीआयडी आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणत्या दिवशी पहिला एपिसोड पाहता येणार, जाणून घ्या.

Shreya Maskar

लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता शो सीआयडी (CID Season 2) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन करण्यासाठी येत आहे. हा बहुप्रतीक्षित शो आहे. या शोने अनेक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आजही या शोचे डायलॉग लोकांच्या तोंडावर आहेत.

सीआयडीचे कलाकार एसीपी प्रद्युमन (Shivaji Satam) , इन्स्पेक्टर अभिजीत (Aditya Srivastava) आणि इन्स्पेक्टर दया (Dayanand Shetty) हे त्रिकूट पुन्हा तुम्हाला भेटायला एका नव्या अंदाजात येणार आहेत. या भूमिकांमध्ये कलाकार शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी हे आहेत. ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या हृदयात आपली जागा बनवली आहे.

सीआयडी या शोने 2018 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. सीआडीने तब्बल 20 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सीआयडीचे डॉयलॉग कुछ तो गडबड हैं, दया तोड दो दरवाजा हे आजही प्रेक्षकांच्या मनावर घर करून आहेत.

सीआयडीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार 21 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर दर शनिवार आणि रविवार पाहता येणार आहे. सीआयडीची रिलीज डेट पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. अभिजीतने दयावर गोळी झाडली होती आणि दया दरीत पडला होता. मात्र आता प्रदर्शित झालेल्या सीआयडीच्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दया पुन्हा येतो. आपल्या दमदार स्टाईलमध्ये दरवाजा तोडून आत प्रवेश करताना दिसत आहे. तो बोलतो की, "शत्रूला धडा शिकवायला दया पुन्हा आला आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT