छोटा पडदा तुफान गाजणारा शो सीआयडी प्रेक्षकांचा सर्वात आवडता शो होता. सीआयडीचे (CID) खूप चाहते आहेत. आजही या शोचचे लोक दिवाने आहेत. जुने एपिसोड चाहते आजही पाहत आहेत. या शोचं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मुलांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वच सीआयडीचे मोठे चाहते आहेत.
सीआयडी या शोने तब्बल 20 वर्ष प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. दया, अभिजीत, डॉ साळुंखे , एसीपी प्रद्युम्न हे प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचले आहेत. आता ही दमदार टीम पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे आणि पुन्हा टिव्ही गाजवणार आहे. सीआयडी आता मराठीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मराठीतून सत्याचा शोध घेण्यासाठी सीआयडीची टीम सज्ज आहे.
सोनी मराठी वाहिनीवर सीआयडी शो हा मराठीतून पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते खूप खुश झाले आहेत. सोनी मराठी वाहिनी आपल्या सोशल मीडियावरून प्रोमो शेअर केला आहे. सीआयडीनं 90चं दशक गाजवलं आहे. तुम्ही प्रोमोमध्ये पाहून शकता की, इंस्पेक्टर दया, इंस्पेक्टर अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न येत आहे गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी... सीआयडी आता मराठीत... असं बोलतानाचा व्हिडीओ सोनी मराठी वाहिनी शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स करून आनंद व्यक्त केला आहे. सीआयडी हा क्राइम इन्व्हेस्टिकेशन शो पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
कुछ तो गडबड हैं, दया तोड दो दरवाजा असे सीआयडीचे डॉयलॉग प्रेक्षकांच्या घरात पोहचले. लोक अनेक वेळा हे डॉयलॉग बोलताना पाहायला मिळतात. हा शो कधी सुरू होणार याची अद्याप तारीख जाहीर झाली नाही. सीआयडी हा शो 1998मध्ये सुरु झाला होता तर 2018 मध्ये याने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 20 वर्षांनी शो बंद झाल्यामुळे प्रेक्षकांना याचे खूप वाईट वाटले होते. मात्र आता प्रेक्षक मराठी सीआयडी पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.