Shivaji Satam World Record News
“दया कुछ तो गडबड है...” असं म्हणत आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभिनेते शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आज ७४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. शिवाजी साटम यांना सोनी टिव्हीवरील 'CID' मालिकेतून प्रचंड मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी 'CID' मालिकेत एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman) यांची भूमिका साकारली होती. शिवाजी साटम यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक लोकप्रिय चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून लोकप्रियता मिळवली. आज शिवाजी साटम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोणता रेकॉर्ड नोंदवला आहे, जाणून घेऊया... (TV Serial)
१९५० साली मुंबईत जन्मलेले शिवाजी साटम यांची गणना सुशिक्षित अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांत शिक्षण घेतले आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांनी बँकेत नोकरी केली. त्यानंतर त्यांच्या अभिनयाची कारकीर्द १९७५ साली ‘रॉबिनहूड’ या मराठी बालनाट्यापासून झाली. 1980 मध्ये ‘रिश्ते-नाते’ या फेमस टिव्ही सीरियल मधून साटम यांनी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. १९९८ पासून टेलिकास्ट झालेल्या 'CID' टिव्ही शोने शिवाजी साटम यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली आहे. भारतातील सर्वात जास्त वेळ चालणारा 'CID' टीव्ही शो आहे. २१ जानेवारी १९९८ रोजी सुरू झालेला 'CID' मालिकेचा शेवटचा भाग २७ ऑक्टोबर २०२८ रोजी टेलिकास्ट झाला. (Television Actor)
'CID' हा टीव्ही शो शिवाजी साटम यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला. या शोमुळे शिवाजी साटम यांना घराघरात लोकप्रियता मिळाली आहे. २००४ मध्ये, या शोने टेलिव्हिजन इतिहासात सर्वात जास्त वेळ अनकट शूटिंग करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. 'CID' टीमने १११ मिनिटे कोणताही कट न घेता सर्वात लांब वन टेक शॉट शूटिंग केली. हा भाग शूट केल्यानंतर 'CID'च्या टीमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हींमध्ये नाव नोंदवले. शिवाजी साटम यांच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी गोष्ट होती. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.