Parampara Trailer: आयुष्य आणि परंपरातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार, 'परंपरा'चा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित

Parampara Trailer Out: पूर्वीपासून लादलेल्या परंपरा खूप काही गोष्टी शिकवतात. समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम सांगणाऱ्या 'परंपरा' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झालेला आहे.
Parampara Official Trailer Out
Parampara Official Trailer OutSaam Tv

Parampara Official Trailer Out

मराठी सिनेरसिकांसाठी हे वर्ष प्रेक्षकांसाठी खास ठरलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित 'परंपरा' हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. पूर्वीपासून लादलेल्या परंपरा खूप काही गोष्टी शिकवतात. पण अनेक परंपरा माणूस आपल्या स्वार्थासाठी बदलतो. समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम सांगणाऱ्या 'परंपरा' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झालेला आहे.

Parampara Official Trailer Out
Milind Gawali On Lok Sabha 2024: "सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून.."; अभिनेता मिलिंद गवळीची पोस्ट व्हायरल

प्रतिकूल परिस्थितीत परंपरेच्या जपणुकीवर चित्रपटाचे कथानक आहे. प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्र निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे मधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे. एकंदरीत ‘परंपरा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही, तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्त्व दर्शवणारा आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचं जगणं, सामाजिक ताण याचं दर्शनही हा चित्रपट घडवतो.

अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल यात शंका नाही. हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत "परंपरा" या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे.

अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

Parampara Official Trailer Out
Prajakta Mali: "ही हॉलिवूड ॲक्ट्रेस कोण?" मराठमोळ्या प्राजक्ताचा वेस्टर्न आऊटफिट लूक पाहून चाहत्याची मजेशीर कमेंट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com