CID Fame Freddy AKA Dinesh Phadnis Death CID Fame Freddy AKA Dinesh Phadnis Death at the Age of 57 - Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dinesh Phadnis Passed Away: CID फेम दिनेश फडनीस यांचे निधन, टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का

Freddy of Cid AKA Dinesh Phadnis: दिनेश फडनीस यांचे मुंबईतील तुंगा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सोमवारी रात्री 12 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Priya More

Freddy Of CID AKA Dinesh Phadnis Passes Away:

टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. सीआयडीमध्ये फ्रेड्रिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडनीस यांचे निधन झाले आहे. दिनेश फडनीस यांचे सोमवारी मुंबईमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश फडनीस यांचे मुंबईतील तुंगा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहेत. सोमवारी रात्री 12 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. दिनेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी तुंगा रुग्णालयामध्ये दाखल केले होते.

उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. पण सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सीआयडीमधील त्यांचे सहकलाकार दयानंद शेट्टी यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

दिनेश फडनीस यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बोरीवली पूर्वच्या दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निवासस्थानी सीआयडीची संपूर्ण टीम दाखल झाली आहे. त्यांच्या निधनानंतर सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT