Dunki Trailer: प्रतीक्षा संपली! 'ये कहानी मैंने शुरू की थी...मैं ही खत्म करूंगा', 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Dunki Trailer Released: शाहरुखचे चाहते या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. 'डंकी ड्रॉप 4' चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे.
Dunki Trailer
Dunki TrailerSaam Tv

Dunki Movie:

'पठाण' (Pathan) आणि 'जवान'च्या (Jawan Movie) ब्लॉकबस्टर यशानंतर आता बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पठान' आणि 'जवान'नंतर आता 'डंकी' (Dunki Movie) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

'डंकी' चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखचे चाहते या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. 'डंकी ड्रॉप 4' चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाहरुख खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर डंकीचा ट्रेलर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ही कथा मी सुरू केलीये...लट्टूतून...याला मीच संपवणार. डंकीच्या कथेचा प्रवास राजू सरांच्या दूरदृष्टीने सुरू झाला. हे तुम्हाला मैत्री, कॉमेडी आणि शोकांतिका हे तिन्ही दाखवेल. प्रतीक्षा संपली आहे... डंकी ड्रॉप 4 आता रिलीज झाला आहे.'

डंकीच्या ट्रेलरची सुरूवात डीडीएलजी सारखी होतो. यामध्ये शाहरुख खान स्टायलिश लूकमध्ये मस्त गॉगल घालून लट्टू स्टेशनवर उतरताना दिसतो. यानंतर तो त्याच्या चार मित्रांशी ओळख करून देतो. त्यापैकी एक हेअर कटिंगचे काम करतो, एक कपड्याच्या दुकानात, तर एक इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि किंग खान एकीच्या प्रेमात पडतो.

Dunki Trailer
Jhimma 2 Story: तुम्ही पाहिलेल्या ‘झिम्मा २’ची स्टोरी आहे रियल, दिग्दर्शकाच्या सासूबाईंवरच आधारित आहे कथा

या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, विकी कौशल इंग्रजी शिकताना दिसत आहे. पण इंग्रजी येत नसल्याने त्यांचे लंडनला जाण्याचे स्वप्न भंगले. यानंतर ट्रेलरमध्ये शाहरुख खान कधी बॉर्डरवर मित्रांसोबत बंदुकीची गोळी लागल्यामुळे जखमी झालेला दिसतोय. तर कधी मित्रांना गोळीबारातून वाचवताना दिसतोय. ३ मिनिटं २१ सेकंदाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

Dunki Trailer
Vicky Kaushal आणि Kiara Advani ला त्यांचे पार्टनर काय नावाने हाक मारतात?, Koffee With Karan 8 मध्ये केला खुलासा

डंकीचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही मिनिटांतच व्हायरल झाला असून त्याला चांगली पसंती मिळत आहे. हा चित्रपट यावर्षी 21 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख खानशिवाय या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

Dunki Trailer
Dinesh Phadnis Passed Away: CID फेम दिनेश फडनीस यांचे निधन, टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com