Vicky Kaushal आणि Kiara Advani ला त्यांचे पार्टनर काय नावाने हाक मारतात?, Koffee With Karan 8 मध्ये केला खुलासा

Vicky Kaushal And Kiara Advani Video: कियारा आडवाणी आणि विकी कौशल या दोघांनी देखील आपल्या पार्टनरसोबत पर्सनल लाइफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या सेलिब्रिटींचे पार्टनर त्यांना काय नावाने हाक मारतात याचे त्यांनी मजेशीर उत्तरं दिली आहेत.
Koffee With Karan 8
Koffee With Karan 8Saam Tv

Koffee With Karan 8 New Promo:

बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माता करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक स्टार सेलिब्रिटींनी आतापर्यंत हजेरी लावली. या शोला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अशामध्ये या शोमध्ये कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि विकी कौशल (Vicky Kushal) यांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी दोघांनी देखील आपल्या पार्टनरसोबत पर्सनल लाइफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या सेलिब्रिटींचे पार्टनर त्यांना काय नावाने हाक मारतात याचे त्यांनी मजेशीर उत्तरं दिली आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'कॉफी विथ करण 8'चा नवा प्रोमो सध्या समोर आला आहे. करण जोहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'कॉफी विथ करण 8' चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, कियारा आडवाणी आणि विकी कौशल यांनी या शोमध्ये धासू एन्ट्री घेतली. हा प्रोमो शेअर करताना करणने कियाराला सुंदर आणि विकी कौशलला बहादुर असे म्हटले आहे. प्रोमोच्या सुरुवातीला विकी करणला सांगतो की, 'आम्ही इथे शुद्धीकरणासाठी आलो आहोत.' हे ऐकून कियारा हसायला लागते.

पुढे प्रोमोमध्ये विकी आणि कियारा गेम राउंड खेळताना दिसत आहेत. गेम राऊंड दरम्यान करण जोहरने त्या दोघांना तीन गोष्टी सांगण्यास सांगितले. त्यामध्ये करणने विचारले की तुमचा पार्टनर तुम्हाला काय नावाने हाक मारतो. यावर सॅम बहादूर फेम विकी कौशलने मजेशीर उत्तर दिले आणि म्हटले, 'बूबू, बेबी आणि ऐ' या नावाने कतरिना हाक मारते असे सांगितले.हे ऐकून करण आणि कियारा जोरात हसायला लागतात. तर कियारा अडवाणी सांगते की, सिद्धार्थ आणि मी एकमेकांना मंकी म्हणजेच माकड या नावाने हाक मारतो.

Koffee With Karan 8
Dinesh Phadnis Passed Away: CID फेम दिनेश फडनीस यांचे निधन, टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का

या प्रोमोमध्ये पुढे दिसत आहे की, विकी कौशल आणि कियारा अडवाणीने 'चिकनी चमेली' या गाण्यावर जबरदस्त ठुमके लावत डान्स केला. या शोचा प्रोमो रिलीज होताच तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कियारा आणि विकीची जोडी चाहत्यांनाही खूप आवडते. त्यामुळे आता ते या शोचा हा एपिसोड रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, 'कॉफी विथ करण 8'च्या मागच्या एपिसोडमध्ये राणी मुखर्जी आणि काजोल या बहिणींनी हजेरी लावली होती.

Koffee With Karan 8
Dunki Trailer: प्रतीक्षा संपली! 'ये कहानी मैंने शुरू की थी...मैं ही खत्म करूंगा', 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com