Ulhasnagar News: बापरे! पोटात दुखतं म्हणून रुग्णालयात गेली; शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातून निघाला अर्धा किलो मांसाचा गोळा

Ulhasnagar Government Hospital: उल्हासनगरच्या (Ulhasnagar) शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एक मोठी आणि चकित करणारी शस्त्रक्रियाघडली आहे. डॉक्टरांनी एका महिलेच्या गर्भाशयातील तब्बल
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam TV
Published On

अजय दुधाणे, उल्हासनगर

Ulhasnagar News:

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एक मोठी आणि चकित करणारी शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टरांनी एका महिलेच्या गर्भाशयातील तब्बल अर्धा किलो वजन असलेल्या पाण्याने 'भरलेला मासाचा गोळा" दुर्बिणीच्या सहाय्याने बाहेर काडला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ulhasnagar News
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर जादूटोणा करण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

वैद्यकीय भाषेत याला Paratubal cyst असे म्हटले जाते. शस्त्रक्रिया झालेली महिला उल्हासनगर कॅम्प एकमध्ये राहते. मागील दोन महिन्यांपासून तिला पोटात दुखत होते. घरी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महिलेने रुग्णालयात (Hospital) उपचान न घेण्याचा निर्णय घेतला. तिने काही दिवस दुखणं अंगावर काढलं. दुखणं अंगावर काढल्याने काही दिवसांनी तिला पोटात असह्य वेदना जाणवू लागल्या.

त्यामुळे तिने थेट उल्हासनगरचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तिच्या पोटाची सोनोग्राफी केली. त्यावर तिच्या पोटात पाण्याच्या मासाचा गोळा असल्याचे समजले. डॉक्टर तृप्ती रोकडे आणि इतर डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी अडीच तास शस्त्रक्रिया करत या महिलेच्या पोटातून अर्धा किलोचा गोळा बाहेर काढण्याचे ठरले.

ही शस्त्रक्रिया सुरू असताना महिलेला भविष्यात गर्भधारणा होताना कोणताही त्रास होणार नाही, याकडे डॉक्टरांनी विशेष लक्ष्य दिलं. त्यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया पूर्ण केली. याबाबत मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी सांगितले की अवघे तीन टाके टाकून महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात यश आलंय.

गर्भाशयातील तब्बल अर्धा किलोचा पाण्याने भरलेला मासाचा गोळा दुर्बिणीच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करून काढला आहे. लाखो रुपये लागणारी शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात मोफत झाल्याने महिलेने डॉक्टरांचे धन्यवाद व्यक्त केलेत. या महिलेची आणि झालेल्या शस्त्रक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Ulhasnagar News
Crime News: केडीएमसी कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक; हल्ल्यामागच्या मास्टरमाईंडचा शोध सुरु

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com