अभिजित देशमुख
कल्याण : केडीएमसी कर्मचारी विनोद लंकेश्री याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ल्याप्रकरणी (Dombivali) डोंबिवली रामनगर पोलिसांनी चार हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या. मात्र हल्ला कशासाठी आणि (Kalyan) काेणाच्या सांगण्यावरुन केला गेला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण? याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यलयाजवळ केडीएमसी कर्मचारी विनोद लंकेश्री याच्यावर एका अनोळखी इसमाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या (Crime News) या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. हल्लेखोर हल्ला करून पसार झाले होते. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिस निरिक्षक आशा खापरे यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी शहाजी नरडे, पोलिस अधिकारी योगेश सानप, अजिंक्य धोंडे याांची तीन पथके तपासाकरीता रवाना झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे या हल्लेखोराची ओळख पटवली. हे हल्लेखोर घाटकोपर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा रचत कमरुद्दीन शेख, अरबाज सय्यद, मोहम्मद इस्त्रालय मोहिद्दीन शहा, शाहरुख शेख या आरोपीना अटक केली आहे. यामधील कमरुद्दीन याने हल्ला केला होता. तर उर्वरित तीन साथीदार कमरुद्दीनला सुरक्षित पळवून नेण्यासाठी आजूबाजूला लपून बसले होते. या चौघांना अटक करण्यात आली असली या चौघांनी विनोद लंकेश्री यांच्यावर हल्ला का केला, कोणाच्या सांगण्यावरून केला. याचा अद्याप उलगडा झालेला नाही. चौघे हल्लेखोर रिक्षा चालक आहेत. यांचा लंकेश्री यांच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे या हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण याचा शोध पोलीस घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.