Unseasonal Rain : चौथ्या दिवशीही शहादा तालुक्यात अवकाळीचा कहर; केळी, पपई बागा उध्वस्त

Shahada News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आजच्या (Nandurbar) सलग चौथ्या दिवशी देखील पावसाचे आगमन झाले असून शहादा (Shahada) तालुक्यात याचा अधिक फटका बसला आहे. पावसामुळे केळी व पपईच्या बाग उध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.  (Live Marathi news)

Unseasonal Rain
Fraud Case : गुंतवणूक करण्याचे आमिष; वृद्धेची पाच लाखांत फसवणूक

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साधारण ३ हजार हेक्टरवर नुकसानीचा अंदाज आहे. परंतु या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यावर नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने व्यक्त केला गेला आहे. यात आज पुन्हा (Rain) पाऊस झाल्याने नुकसानीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain
Shrirang Barne News : गृहमंत्री अमित शहा यांनीच मावळ लोकसभेची उमेदवारी केली फिक्स: खासदार श्रीरंग बारणे यांचा गौप्यस्फोट

केळी, पपईला फटका 

शहादा तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तोरखेडा परिसरात (Farmer) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील केळी आणि पपईच्या बागा उध्वस्त झाल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीचे लवकर पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com