Chhaava SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava : अजूनही 'छावा' न पाहणाऱ्यांसाठी उत्तम संधी, फक्त ९९ रूपयांत पाहता येणार चित्रपट

Chhaava Movie Ticket In Rs 99 : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट आता फक्त ९९ रूपयांत पाहता येणार आहे. कधी आणि कुठे याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' (Chhaava ) चित्रपट रिलीज होऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे. तरी देखील 'छावा'ची क्रेझ कमी होत नाही. आजही 'छावा' पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल्ल दिसत आहे. आता तर एकदा पाहिलेले प्रेक्षकही 'छावा' पुन्हा पाहायला थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. अशात आता 'छावा' पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'छावा' चित्रपट आता तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

'छावा' चित्रपट फक्त ९९ रूपयांत

'छावा' चित्रपटाचे निर्माते मॅडॉक फिल्मसने प्रेक्षकांसाठी मोठ्या ऑफरचा खुलासा केला आहे. विकी कौशलचा 'छावा' चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 मार्चला फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. मात्र ही ऑफर फक्त शुक्रवारपर्यंतच लागू आहे. तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात तुम्ही आताच तुमची सिट बुक करा आणि हा ऐतिहासिक चित्रपट पाहा.

'छावा' चित्रपटातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' हा 2025 चा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. 'छावा' विकी कौशलच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. विकी कौशलचा 'छावा' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

'छावा' चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal ) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत , साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईची भूमिकेत आणि औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे. यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT