Bhushan Pradhan: भूषण प्रधानाने 'छावा' चित्रपटातील भूमिकेसाठी दिला नकार; म्हणाला,'कोणती तरी भूमिका मी अशीच...'

Bhushan Pradhan On chhaava Movie: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित छावा चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी नकार दिल्यामुळे अभिनेता भूषण प्रधान चर्चेत आहे.
Bhushan Pradhan On chhaava Movie
Bhushan Pradhan On chhaava Moviesaam Tv
Published On

Bhushan Pradhan: मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान त्याच्याकामामुळे आणि त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. पण सध्या त्याची चर्चा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित छावा चित्रपटाशी जोडल्यामुळे होत आहे. एका मुलाखतीत भूषणने छावा चित्रपटासाठी नकार दिल्याचे सांगितले आहे.

'नवशक्ती'ला दिलेल्या एका मुलाखतीत भूषण म्हणाला, २०२१ साली आलेल्या 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेत मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तेव्हा महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य. मी महाराजांची भूमिका जगलो आहे. माझ्यावर त्या भूमिकेचा अजूनही प्रभाव आहे.

भूषण पुढे म्हणाला, "महाराजांची भूमिका मिळणं हे नशीब आहेच. पण त्यासोबत प्लॅनिंगही लागते. २०११ नंतर महाराजांच्या भूमिकेमुळे मला इतरही बऱ्याच ऐतिहासिक भूमिका मिळत गेल्या. अगदी सध्या गाजत असलेल्या 'छावा' चित्रपटातील काही भूमिकांसाठी माझा विचार झाला होता. पण महाराजांची भूमिका केल्यानंतर फक्त हिंदी चित्रपट आहे म्हणून त्यातली कोणती तरी भूमिका मी अशीच करणार नाही. त्यामुळे मी नाही म्हणू शकतो.

भूषण प्रधान सध्या चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. मराठी चित्रपटसृष्टीत भूषण एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याचे 'जुनं फर्निचर' आणि 'घरत गणपती' हे दोन चित्रपट खूप गाजले. आता लवकरच भूषणचा 'गाव बोलावतो' हा सिनेमा रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com