Chhaava Box Office Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, १६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

Chhaava Box Office Collection Day 16 : 'छावा' या चित्रपटाने १६ दिवसांत बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटाने खूप कमी वेळात उंच भरारी घेतली आहे. 'छावा' विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'छावा'चे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून चित्रपटातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 16

  • 'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 32 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 23 कोटी रुपये

  • नववा दिवस - 45 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 40 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 19.10 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये

  • तेरावा दिवस - 21.75 कोटी रुपये

  • चौदावा दिवस- 12 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस - 400 कोटींचा टप्पा पार

  • सोळावा दिवस - 21 कोटी रुपये

  • एकूण - 433.50 कोटी रुपये

'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' चित्रपटाने 'स्त्री 2', 'बाहुबली 2', 'पुष्पा 2', 'जवान' यांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. विकी कौशलच्या 'छावा'नं जगभरात 500 कोटींचा टप्पा पार केल आहे. तर बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा पार करून 500 कोटींची घोडदौड सुरू झाली आहे.

'छावा' स्टारकास्ट

'छावा'मध्ये अनेक मराठी कलाकार पाहायला मिळाले आहेत. यामुळे चित्रपटाची शोभा आणखी वाढली आहे. 'छावा' चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल पाहायला मिळत आहे. त्याने चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका साकारली आहे. चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) झळकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT