Vicky Kaushal: 'पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…'; विकी कौशलच्या कवितेने जिंकली प्रेक्षकांची मने

Vicky Kaushal Marathi Poem : सध्या छावा चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विकी कौशलने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कुसुमाग्रज यांची कणा ही कविता अस्खलित मराठीत सादर करून प्रेक्षकांची माने जिंकली.
Vicky Kaushal Marathi Poem
Vicky Kaushal Marathi PoemSaam Tv
Published On

Vicky Kaushal Marathi Poem: काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून दादर येथील शिवाजी पार्कमध्ये अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित उद्धाटन कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर, अभिनेते अशोक सराफ, विक्की कौशल, रितेश देशमुख, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, महेश मांजरेकर, लक्ष्मण उतेकर, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यास अनेक दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थिती होते. यावेळी अनेक मान्यवरांनी कविता वाचन केलं. त्यामध्ये सध्या छावा चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विकी कौशलने देखील कुसुमाग्रज यांची कणा ही कविता अस्खलित मराठीत सादर करून प्रेक्षकांची माने जिंकली.

कवितेची सुरुवात करताना विकी म्हणाला, राज ठाकरेंनी जेव्हा मला सांगितले की कुसुमाग्रज यांची एक कविता 'कणा' तुम्हाला सादर करायची आहे. मी त्यांना विचारले सॉरी पण कणा याचा अर्थ काय असतो. त्यावर त्यांनी म्हटलं कणा म्हणजे स्पाईन. छावा हा चित्रपट केल्यानंतर मला या शब्दाचा अर्थ समजला” असे म्हणतात विकीने कणा ही कविता सादर केली.

Vicky Kaushal Marathi Poem
Hardik Shubhechcha: लग्नानंतरची गोष्ट सांगणार; ‘हार्दिक शुभेच्छा... पण त्याचं काय?’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरटयात राहून

माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी माञ ठेवले

कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा…

Vicky Kaushal Marathi Poem
Chhaava Box Office Collection: 'छावा'ची घोडदौड ४०० कोटींकडे, १४ व्या दिवशी किती रूपयांचा गल्ला जमवला?

त्याने सादर केलेली कविता अचूक आणि सुंदर मराठीत असल्यामुळे सोशल मीडियावर त्याने मोठ्याप्रमाणात कौतुक होत आहे. विकी सुंदर मराठी बोलू शकतो हे समजल्यावर त्याचे अनेक चाहते आवक झाले आहेत. विकीच्या कवितेचा हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत असून या व्हिडीओवर अनेक कौतुकास्पद कमेंट चाहते करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले, किती रिस्पेक्टफुली कविता वाचत होते, खरच छान वाटलं. तर, दुसऱ्याने किती विनम्र वक्तिमत्व आहे अशी कमेंट केली. या विकीच्या नम्रपणाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटांवर नक्कीच चांगला प्रभाव पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com