Shreya Bugde-Kushal Badrike SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shreya Bugde-Kushal Badrike : कुशल अन् श्रेयाची जोडी पुन्हा दिसणार पडद्यावर, 'त्या' फोटोनं वेधलं लक्ष

Kushal-Shreya Work Together: 'चला हवा येऊ द्या' हा शो आपल्या कॉमेडीने गाजवणारे कुशल आणि श्रेया पुन्हा एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Shreya Maskar

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोने खूप काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या शोमुळे कलाकारांना देखील खूप लोकप्रियता मिळाली. हा शो कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. हा शो बंद झाल्यामुळे आजही चाहते या कार्यक्रमाची आठवण काढतात. 'चला हवा येऊ द्या' या शोने जगाला खळखळून हसवले आहे.

आता पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या' या शोमधील कलाकारांची चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्यामुळे ते दोघे आता पुन्हा एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 'चला हवा येऊ द्या' शोनंतर कुशल आणि श्रेया पुन्हा एकत्र येणार आहेत.

कुशल (Kushal Badrike) आणि श्रेयाने (Shreya Bugde) सोशल मीडियावर शूटिंगच्या बाहेरचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एकत्र पोज करताना , हसताना पाहायला मिळत आहे. श्रेयाने फोटोमध्ये ब्लॅक रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. कुशलने ब्लॅक पॅन्ट, हिरव्या रंगाचा टी शर्ट आणि जॅकेट परिधान केले आहे. दोघेही गॉगल लावून स्टाइलमध्ये पोज करत आहेत.

कुशल आणि श्रेयाने फोटोंना खूप हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिले की,"बॅक टू बेसिक...शूटिंग दिवस..." असे लिहून झी मराठीच्या अधिकृत अकाउंटला मेंशन केले आहे. मात्र अद्यापही ही जोडी कोणत्या शोचे शूटिंग करत आहे. याचा खुलासा झाला नाही आहे. पण चाहते या बातमीने खूप खुश आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT