Shreya Ghoshal: 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली श्रेया घोषाल; जिंकली चाहत्यांची मने, पाहा VIDEO

Shreya Ghoshal- Ganesh Acharya Dance Video : 'पुष्पा 2' चित्रपटातील 'अंगारो सा' गाण्यावर गायिका श्रेया घोषाल आणि डान्सर गणेश आचार्य यांनी जबरदस्त डान्स केला आहे.
Shreya Ghoshal- Ganesh Acharya Dance Video
Shreya GhoshalSAAM TVC
Published On

'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या गाण्याने तर प्रेक्षकांना वेड लावले आहे. सोशल मिडिया उघडताच 'पुष्पा 2'ची गाणी ऐकू येतात.

'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अल्लू अर्जुनने पुष्पाचे पात्र साकारले आहे. तर रश्मिकाने श्रीवल्लीचे पात्र साकारले आहे. 2024 चा 'पुष्पा 2' बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.

'पुष्पा 2'च्या गाण्यांनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला असून. प्रत्येकजण 'अंगारो सा' गाण्यावर रील बनवताना पाहायला मिळत आहेत. अशीच एक रील सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही रील एका गायिकेची आहे. गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghosha) 'अंगारो सा' (Angaaron Song) गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सुप्रसिद्ध डान्सर गणेश आचार्य (Ganesh Acharya ) यांच्या सोबत 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गणेश आचार्य यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यांच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची भन्नाट केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. या पूर्वी रिलीज झालेल्या 'पुष्पा ' चित्रपटातही रश्मिका आणि अल्लू अर्जुन दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आता 'पुष्पा 2'साठी चाहते आतुर आहेत. 'पुष्पा २: द रुल' चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच बंपर कमाई केली आहे.

Shreya Ghoshal- Ganesh Acharya Dance Video
Pushpa 2ची जबर क्रेझ; अवघ्या 3 तासात 15,000 तिकिटांची विक्री, 4 दिवसात मोडणार शाहरूख खान-प्रभासचा रेकॉर्ड?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com