Happy Birthday Shreya Ghoshal: मधुर आवाजाने बॉलिवूड गाजवणारी श्रेया घोषाल आहे इतक्या कोटींची मालकीण...

Chetan Bodke

श्रेया घोषालचा चाहतावर्ग

गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या गोड सुमधुर आवाजाने फक्त देशातच परदेशातही मोठा चाहतावर्ग तयार केला.

Shreya Ghoshal Photos | Instagram @shreyaghoshal

श्रेया घोषालचा ४० वा वाढदिवस

पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या श्रेयाचा आज ४० वा वाढदिवस आहे. तिचा जन्म १२ मार्च १९८४ रोजी झाला असून तिचं बालपण राजस्थानमध्ये गेले.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

चौथ्या वर्षापासून गायला सुरुवात

श्रेयाने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायला सुरुवात केली आहे. श्रेया हिंदी, मराठीसह बंगाली भाषेतील गाणेही गाते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

श्रेयाने आपल्या गायनाच्या कारकीर्दीत चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाचा परदेशातही सन्मान

श्रेयाला फक्त भारतातच नाही तर, परदेशातही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

'श्रेया घोषाल दिवस'

अमेरिकेतील ओहायो राज्याचे राज्यपाल टेड स्ट्रिकलँड यांनी २६ जून २०१० पासून तो दिवस 'श्रेया घोषाल दिवस' म्हणून घोषित केला होता.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

१८५ कोटींची मालकीण

मनीमिंटच्या अहवालानुसार, श्रेया तब्बल १८५ कोटींची मालकीण आहे. तिचे वार्षिक उत्पन्न जवळपास ३.७ कोटी इतके आहे..

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाची एका गाण्याची फी किती?

आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी दिशा एका गाण्यासाठी लाखो रुपये फी आकारते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाच्या फॅशनची भुरळ

श्रेयाच्या फॅशनची चाहत्यांवर भुरळ कायम असून तिच्या फोटोंचे कायमच कौतुक होत असते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

NEXT: आकाशी चंद्र चांदण्या...; जान्हवी कपूरचा शिमरी साडीत स्टायलिश अंदाज

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor