
सुपरस्टार अल्लू अर्जुन तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास येत आहे. पुष्पा 2 चित्रपटाबाबत अनेक मोठे अपडेट्सही समोर येत आहेत. आता या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झालीय. याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडील अहवालांनुसार, आगाऊ बुकिंग सुरू झाल्यापासून 3 तासांच्या आत चित्रपटाने चांगली तिकिटे विकली गेली.
शनिवार 30 नोव्हेंबर 2024 पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चेन्समध्ये पुष्पा 2 चे आगाऊ बुकिंग सुरू झाले. बुकिंग सुरू होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या 3 तासांत या चित्रपटाच्या वेगवेगळ्या चेन्समध्ये 15,000 तिकिटे विकली गेली. PVR आणि INOX यांची मिळून 12,500 तिकिटे विकली गेली, तर दुसरीकडे सिनेपोलिसची 2,500 तिकिटे विकली गेली. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवसाच्या अखेरीस किंवा आगाऊ बुकिंगच्या सुरुवातीच्या दिवशी 30,000 ते 35,000 तिकिटे विकली जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या पुष्पा 2 च्या रिलीजला 4 दिवस बाकी आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट 5 डिसेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे.यानुसार या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगसाठी अद्याप 4 दिवस बाकी आहेत. या चार दिवसांत या चित्रपटाची किती तिकिटे विकली जातात हे पाहणे बाकी आहे. प्रभासच्या बाहुबली 2 ने आगाऊ बुकिंगच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट विक्रम केलाय. या चित्रपटाची 6.50 लाख तिकिटे विकली गेल्याचा विक्रम आहे. दुसरा क्रमांक शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा आहे.
या चित्रपटाची 5.57 लाख तिकिटांची आगाऊ विक्री झाली होती. तिसरा क्रमांक शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाचा आहे. या चित्रपटाची 5.56 लाख तिकिटे विकली गेली होती. तसेच यशच्या KGF Chapter 2 या चित्रपटाची 5.15 लाख तिकिटे विकली गेली होती. यामुळे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट हा मोठा विक्रम मोडू शकेल का, हे पाहणे औत्सुक्यचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.