AIFF 2025 : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख ठरली, जगभरातील ६५ चित्रपटांची मेजवानी

Ajanta Verul International Film Festival 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अपडेट जाणून घ्या.
Ajanta Verul International Film Festival 2025
AIFF 2025aifilmfest
Published On

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (Ajanta Verul International Film Festival 2025) घोषणा आज करण्यात आलीय. १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगरमधील पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल येथे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि विविध भाषांमधील 60 चित्रपट दाखवले जाणार आहे. भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी 105 वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिध्द मुकपट 'कालिया मर्दन' याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी संपन्न होणार आहे.

शंभर वर्षांपूर्वीचे मुकपट सिनेगृहात प्रत्यक्ष संगीताद्वारे दाखविले. तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील 'सतब्दीर सब्द' या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला जाणार आहे. महोत्सवात भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे.

Ajanta Verul International Film Festival 2025
Abhishek- Aishwarya : All Is Well! अभिषेक एअरपोर्टवर कुटुंबासोबत स्पॉट; ऐश्वर्याने मराठीत साधला संवाद, Video Viral

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश

आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट छत्रपती संभाजीनगरच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.

कालिया मर्दन विशेष प्रदर्शन, उद्घाटन सोहळा व जीवन गौरव पुरस्कार

महोत्सवाच्या दशकपुर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजन समितीच्या वतीने मराठवाड्यातील रसिकांना एका विशेष कार्यक्रमाची भेट दिली जाणार आहे. भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिध्द मुकपट ‘कालिया मर्दन’ याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी संपन्न होणार आहे. शंभर वर्षांपूर्वीचे मुकपट सिनेगृहात प्रत्यक्ष संगीताद्वारे (लाईव्ह ऑर्केस्ट्रा) दाखविले जात. तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील ‘सतब्दीर सब्द’ या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला जाणार आहे. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात बुधवारी, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायं. ५ वा. या मुकपटाचे प्रदर्शन करण्यात येईल. कालिया मर्दन विशेष प्रदर्शन व उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश खुला असेल.

कलाकारांची उपस्थिती व संवाद

स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा

महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्‍या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख २५,००० रूपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

महोत्सवात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

Ajanta Verul International Film Festival 2025
HBD Deepika Padukone: एकेकाळी आयुष्य संपवायचा विचार ते बॉलिवूडची 'मस्तानी', कसा होता दीपिकाचा प्रवास? संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल चकित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com