CHYD  SAAM TV
मनोरंजन बातम्या

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chala Hawa Yeu Dya 2 : 'चला हवा येऊ द्या २' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात अजून एका कॉमेडीच्या किंगची एन्ट्री झाली आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र कॉमेडीचे वारे वाहू लागले आहे. लवकरच 'चला हवा येऊ द्या 2' (Chala Hawa Yeu Dya 2) या शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांचा'चला हवा येऊ द्या' आवडता कार्यक्रम आहे. चाहते आता कार्यक्रमातील कलाकारांची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचा एक खास प्रोमो समोर आला आहे. 'चला हवा येऊ द्या 2'मध्ये कॉमेडीच्या किंगची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची एक झलक पाहायला मिळत आहे. लाल रंगाचा सूट, वाढवलेले केस- दाढीमध्ये हा अभिनेता दिसत आहे. त्यांच्या हातात बंदूक देखील पाहायला मिळते. व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. "खबर आहे गावागावात, कॉमेडीचा डॉन परत येतोय थाटात! कॉमेडीचं गॅंगवार आता सुरू होणार..." असे लिहिलं आहे.

व्हिडीओतला कॉमेडी किंग दुसरा-तिसरा कोणी नसून मराठमोळा अभिनेता प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) आहे. चाहते त्याच्या एन्ट्रीने खूपच खुश झाल्याचे पाहायला मिळत आहेत. प्रियदर्शनने 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या सीझनमध्ये देखील प्रेक्षकांना खूप खळखळवून हसवले आहे. त्याचा विनोद आणि डायलॉगचे चाहते दिवाने आहेत.

सध्या 'चला हवा येऊ द्या 2'चे ऑडिशन सुरू आहे. या शोमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे पाहायला मिळणार आहे. तसेच शोचे सूत्रसंचालन मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. चाहते कॉमेडीच्या मेजवानीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT