Famous Actor  saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor : बायकोला कॅन्सर, त्यातच वडिलांना ब्रेन स्ट्रोक; ICU मध्ये उपचार सुरू, प्रसिद्ध अभिनेत्यावर दुहेरी संकट

TV Actor Father Hospitalized Due To Brain Stroke : टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडीलांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे वडील रुग्णालयात दाखल

ब्रेन स्ट्रोकमुळे वडिलांवर ICU मध्ये उपचार सुरू

अभिनेत्याची बायको कॅन्सरशी झुंज देत आहे.

टिव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दीपिका कक्करच्या सासऱ्यांची म्हणजेच शोएब इब्राहिमच्या वडीलांची अचानक तब्येत बिघडली आहे. ज्याचे अपडेट अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिले आहेत.

अभिनेता शोएब इब्राहिमच्या वडिलांची प्रकृती अचानक खालावली आहे. शोएबच्या वडिलांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. शोएबच्या वडिलांना पुन्हा एकदा ब्रेन स्ट्रोक झाला आहे. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. अभिनेत्याने चाहत्यांना आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. पुढचे २४ तास अभिनेत्याचा वडीलांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. त्यांची प्रकृती खूप चिंताजनक आहे.

शोएब इब्राहिमची पोस्ट

"पप्पांसाठी मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि दुवांची नितांत गरज आहे. आज सकाळी पप्पांना पुन्हा एकदा 'स्ट्रोक' (मेंदूचा झटका) आला असून, त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पुढील २४ तास अत्यंत निर्णायक आहेत..."

शोएब इब्राहिमच्या वडीलांना यापूर्वी म्हणजे २०२१ मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता, ज्यामुळे त्यांना अनेक दिवस रुग्णालयात दाखल राहावे लागले. नंतर त्यांची तब्येत सुधारली आणि ते त्या प्रसंगातून बाहेर आले. शोएब व्लॉग्सच्या माध्यमातून वडिलांच्या प्रकृतीबद्दल वारंवार माहिती देत ​​असतो. गेले अनेक वर्ष शोएब इब्राहिमसाठी खूपच अवघड गेले आहेत, कारण त्यांची बायको दीपिका कक्करची तब्येतही ठीक नाही.

Shoaib Ibrahim

दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज

दीपिका कक्करही गेल्या काही काळापासून तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. आधी स्टेज २ लिव्हर कॅन्सर आणि नंतर एक सिस्ट...दीपिका गेल्या काही काळापासून आजारी आहे. ती सोशल मीडिया पोस्ट्स आणि व्लॉग्सच्या माध्यमातून तिच्या प्रकृतीबद्दल वारंवार अपडेट ती चाहत्यांना देत असते. गेल्या वर्षी शस्त्रक्रिया करून अभिनेत्रीचा ट्यूमर काढण्यात आला आणि अलिकडेच सिस्टची शस्त्रक्रिया झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री! पुणे, साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra News Live Update: उष्माघाताने नागपूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू

Today Horoscope : कुणाच्या नशिबात पैसा, कुणाच्या भाग्यात नोकरी; वाचा आजचे १२ राशींचे भविष्य

Bell Fat Loss: रोज संध्याकाळी करा ही १ सोपी गोष्ट; सुटलेलं पोट कमी होऊन काही दिवसांत मिळेल सडपातळ शरीर

कांद्यानं कापला शेतकऱ्याचा खिसा; कांदा उत्पादकांचं हजारो कोटींचं नुकसान

SCROLL FOR NEXT