Madgaon Express And Swatantrya Veer Savarkar Movie
Madgaon Express And Swatantrya Veer Savarkar Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘Swatantrya Veer Savarkar’ चित्रपटापेक्षा ‘Madgaon Express’ सुपरफास्ट, आतापर्यंतची कमाई किती?

Chetan Bodke

Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 8 Box Office Collection

सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमध्ये नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची मेजवानी सादर केली जाते. अशातच गेल्या आठवड्यामध्ये, रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि प्रतिक गांधीचा ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला.

दोन्हीही वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक कमी गर्दी करत आहेत. कमाईच्या बाबतीत ‘मडगांव एक्सप्रेस’ने ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला मागे टाकले आहे. (Bollywood)

बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शन संथ गतीने झाले. दोन्हीही चित्रपटांनी पहिल्याच दिवशी फारशी कमाई केली नाही. पण हळूहळू मडगांव एक्स्प्रेस चित्रपटाने वेग धरला. बॉक्स ऑफिसवर ‘मडगांव एक्सप्रेस’ सुसाट चालली असून रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला मागे टाकले आहे. कुणाल खेमु दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपटाने एका आठवड्यामध्ये, १३.५ कोटींची कमाई केलेली आहे. शुक्रवारी चित्रपटाने जेमतेम ९० कोटींची कमाई केलेली आहे. पण असं असलं तरी, चित्रपटाने १४. ४० कोटींची कमाई केलेली आहे. तर चित्रपटाने जगभरात १८ कोटींच्या जवळपास कमाई केलेली आहे. (Bollywood Film)

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, रणदीप हुडाचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर निराशाजनक दिसत आहे. रणदीप हुड्डा निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने एका आठवड्यामध्ये, ११ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. तर शुक्रवारी चित्रपटाने १.१५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने आतापर्यंत परदेशात २ कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. चित्रपटामध्ये स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका रणदीप हुड्डाने साकारली आहे. तर ‘बिग बॉस १७’ फेम अंकिता लोखंडेने चित्रपटात सावरकर यांच्या पत्नीचे पात्र साकरले. (Bollywood News)

‘मडगाव एक्सप्रेस’ हा चित्रपट कुणाल खेमूचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अनिवाश तिवारी यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही, मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री छाया कदमही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Eyes: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

SCROLL FOR NEXT