Mirzapur 3 Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Mirzapur 3 Review : कोणत्या ५ कारणांमुळे 'मिर्झापूर ३' सीरीज रटाळ वाटते ? वाचा सविस्तर

Chetan Bodke

ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील 'मिर्झापूर ३' वेबसीरीजची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेरही सीरीज ५ जुलै रोजी रिलीज झालेली आहे. पण प्रेक्षक सीरीजच्या बाबतीत खूपच नाराज झाले आहेत. चार वर्षांनंतर ही सीरीज रिलीज केल्यामुळे चाहते प्रचंड नाराज आहेत. त्यासोबतच सीरीजचे कथानक प्रचंड हळूहळू जात असल्यामुळे चाहते दिग्दर्शकांवर नाराज झाले आहेत. स्टोरीमध्ये सातत्य नसल्यामुळे चाहत्यांकडून सीरीजला प्रतिसादही उत्तम मिळत नाही. प्रेक्षक कोणकोणत्या कारणामुळे सीरीजला नकार देतात, जाणून घेऊया...

मुन्ना भैय्याची कमतरता

सीरीजच्या सुरूवातीला मुन्ना भैय्याची कमी आपल्याला भासते. मुन्ना भैय्याने कालिन भैय्याच्या मुलाचे पात्र साकारले. मुन्ना भैय्याची दहशत आपल्याला सीरीजमध्ये कायम दिसते. मिर्झापूरवर राज्य करणाऱ्या गुड्डू भैय्याचे प्रेरणास्थान मुन्ना असतो. पण या सीझनमध्ये नेमका तोच दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला या सीरीजमध्ये मुन्ना भैय्याची सतत कमी जाणवेल.

कालीन भैय्याच्या छोट्या भूमिका

कालीन भैय्या हे पात्र प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनमध्ये जास्त दिसत नाही. अनेक एपिसोडमध्ये कालीन भैय्याचे फार छोटे पात्र तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक युजर्सच्या मते कालीन भैय्या विना सीरीज अपूर्ण आहे. १० एपिसोड्सच्या ऐवजी ८ एपिसोडमध्ये सीरीज पूर्ण झाली असती. पण निर्मात्यांनी उगाच कथानक ताणले आहे.

इतरत्र पात्रांवर दुर्लक्ष

विस्कटलेले कथानक असलेल्या ह्या सीरीजमध्ये अनेक पात्र तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. त्यातीलच एक म्हणजे लाला आणि रॉबिन. यांची कमतरताही तुम्हाला सीरीजमध्ये अगदी स्पष्टपणे दिसेल. पहिला आणि दुसराच सीझन होता. तिसरा सीझन खूपच रटाळ आणि बोरिंग आहे. तिसऱ्या सीझनमध्ये काहीही विशेष नाही.

डायलॉग्जची कमतरता

रक्तरंजित दृश्य, मारधाड आणि जबरदस्त डायलॉगमुळे या सीरीजचा विशिष्ट मोठा चाहतावर्ग आहे. कुठेही ड्रामा न दाखवता सत्य कथानकावर आधारित असलेल्या ह्या सीरीजने सर्वांचेच लक्ष वेधले. अनेक सीन्स हे खरे जाणवत आहेत. अनेक डायलॉग्जची कमतरता तुम्हाला सीरीजमुळे जाणवेल. “जिस शहर में तुम नौकर बन कर आए हो, मालिक है हम शहर के…” कॉलिन भैय्याच्या ह्या डायलॉगनेही चाहत्यांचे मन जिंकले आहे.

गरज नसताना जास्त एपिसोड्स

४५ मिनिटांचे १० एपिसोड्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला उगाचच दिग्दर्शकांनी कथानक खेचण्याचा प्रयत्न केला आहे, असं जाणवेल. १० एपिसोड्सच्या ऐवजी ८ एपिसोडमध्येही ही सीरीज खूप उत्तम झाली असती. गरज नसताना जास्त एपिसोड घेतल्यामुळे कथानक रटाळ वाटेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

SCROLL FOR NEXT