गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

gas cylinder crisis : गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर कारवाई होण्याची शक्यता आहे. या लोकांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे.
gas cylinder crisis news
gas cylinder crisisSaam tv
Published On
Summary

बीड जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा साठा करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर

19 पदके तैनात

जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

योगेश काशिद, साम टीव्ही

राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणू लागला आहे. ग्राहक गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लावत नागरिक सिलिंडर घेत आहेत. सिलेंडर घेण्यासाठी ऑनलाईन नंबरवर बुकिंग करूनच सिलिंडर मिळत आहेत. घरपोच गॅस सर्वच कंपन्यांनी सिलिंडर देणे बंद केले. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जादा दराने सिलेंडर विक्री होत असून काही साठेबाज आणि सिलिंडरचा काळाबाजार करत असलेल्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. यासाठी बीड जिल्ह्यात 19 पथके तैनात करण्यात आली आहेत.

बीड जिल्हाधिकारी काय म्हणाले?

जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे की, बीड जिल्ह्यामध्ये गॅस एजन्सी आहेत, यांची आम्ही एक आढावा बैठक घेतलेली आहे. घरगुती गॅसची कुठेही अडचण नाही. मोठ्या प्रमाणात टाक्या उपलब्ध आहेत. रुग्णालयासाठी लागणारा जो गॅस आहे, तो आमच्याकडे उपलब्ध आहे. घरगुती गॅसच्या तपासणीसाठी आम्ही 19 पथके तयार केली आहेत.

gas cylinder crisis news
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, बायकोला क्रूरपणे संपवलं; नवऱ्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

बीड जिल्ह्यातील हॉटेल चालकांना आवाहन केले आहे की, तुम्ही घरगुती गॅसचा वापर करू नका. कुणीही विनाकारण बुकिंग करू नका. गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर एक पथक नेमण्यात आले आहे. प्रत्येक हॉटेलची आपण तपासणी करीत आहोत. घरगुती गॅसचा कुठे वापर होत असेल, तर त्यावर आम्ही कार्यवाही करत आहोत. जर तुम्हाला काही अडचण आली तर थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधा बीड जिल्ह्यातील गॅस एजन्सींना आम्ही सांगितले आहे की नागरिकांना योग्य दराने गॅसची विक्री करावी जास्त दराने विक्री केल्यास त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.

gas cylinder crisis news
जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

बीड जिल्ह्यात पाहायला गेलं तर अमेरिका आणि इराण युद्धाचा थेट परिणाम बीडपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. बीड जिल्ह्यात गॅसचा तुटवडा जाणवत आहे, असं नागरिकांना वाटत आहे. मात्र प्रत्यक्षात गॅसच्या टाक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये त्याचबरोबर यासाठी जिल्हास्तरावरून 19 पदके नियुक्त करण्यात आले आहेत, जर कोणी साठा करत असेल, तर त्यावर देखील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com