Shatrughan Sinha Reaction After Sonakshi Jaheer Marriage Google
मनोरंजन बातम्या

Shatrughan Sinha News : सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "४४ वर्षांपूर्वी मी..."

Shatrughan Sinha Reaction After Sonakshi Jaheer Marriage : लेकीच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा भावुक होते. त्यांनी लेकीच्या लग्नानंतर माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने रविवारी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर दादरमधील बॅस्टियन हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नासाठी सोनाक्षीचे वडील आणि दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा नाराज होते. पण कालांतराने त्यांनी आपली नाराजी दूर करत त्यांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. दरम्यान, लेकीच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा भावुक दिसत होते. त्यांनी लेकीच्या लग्नानंतर माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी लेकीच्या लग्नानंतर टाईम्स नाऊला प्रतिक्रिया दिली. लेकीच्या लग्नानंतर काय भावना आहे? असा प्रश्न शत्रुघ्न यांना विचारण्यात आला. "ही काय विचारण्याची गोष्ट आहे का ? प्रत्येक वडील आपल्या मुलीच्या लग्नाची वाट पाहत असतो. जेव्हा मुलीने निवडलेल्या मुलाला तिला सोपवायचं असतं. तेव्हा त्या दोघांचंही नातं सुरक्षित राहायला हवं. शत्रुघ्न सिन्हा यांनी ४४ वर्षांपूर्वी प्रतिभाशाली मुलगी पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्न केलं. आता सोनाक्षीनेही तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे." अशी प्रतिक्रिया लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलेली आहे.

झहीरसोबतच्या आंतरधर्मीय विवाहामुळे सोनाक्षीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. लग्नावेळी शत्रुघ्न सिन्हा आपल्या लेकीच्या बाजुलाच उभे होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान तर होतेच, पण सोबतच चेहरा भावूकही होता. सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाक्षी- झहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सोनाक्षी- झहीर २३ जून २०१७ पासून एकत्र आहेत. त्यांनी लग्न २३ जून २०२४ ला केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT