Randeep Singh Bhangu Death : प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्याने छोट्या चुकीमुळे गमावला जीव, दारू समजून प्यायला किटकनाशक

Randeep Singh Bhangu Passed Away : प्रसिद्ध पंजाबी अभिनेता रणदीप सिंह भंगू याला आपली एक छोटी चूक महागात पडली. त्या चुकीमुळे अभिनेत्याचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झाले आहे.
Randeep Singh Bhangu Death : प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्याने छोट्या चुकीमुळे गमावला जीव, दारू समजून प्यायला किटकनाशक
Randeep Singh Bhangu Passed AwaySaam Tv

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप सिंह भंगू याचं निधन झाले आहे. त्याचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्याला त्याची एक चूक चांगलीच महागात पडली आहे. या चुकीमुळे अभिनेत्याने आपला जीवच गमावला आहे. अभिनेत्याने दारू समजून किटकनाशकाचं औषध प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

Randeep Singh Bhangu Death : प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्याने छोट्या चुकीमुळे गमावला जीव, दारू समजून प्यायला किटकनाशक
Vada Paav Girl And Ranveer Shorey Dispute : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात राडा, वडापाव गर्ल आणि रणवीरमध्ये झालं कडाक्याचं भांडण

रणदीप सिंह भंगू हा पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटु्ंबीयांसह त्याच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दारू समजून किटकनाशक प्यायल्याने अचानक अभिनेत्याची तब्येत ढासळत गेली. त्यानंतर त्याला लगेचच चंदीगढमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. पण त्याची उपचाराअंती प्राणज्योत मालवली. अभिनेत्यावर चमकौर साहिबजवळील चुहाडमाजरा या त्याच्या गावी काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

Randeep Singh Bhangu Death : प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्याने छोट्या चुकीमुळे गमावला जीव, दारू समजून प्यायला किटकनाशक
Sonakshi- Zaheer Reception Videos: सोनाक्षी- झहीरच्या रिसेप्शनला अवघं बॉलिवूड अवतरलं; रेखा, सायरा बानू, काजोल, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी

पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्याला दारुचं व्यसन लागलं होतं. तेच व्यसन त्याच्या अंगलट आलं आहे. तो आधीपासूनच नशेत होता. शेतात ठेवलेली किटकनाशकाची बाटली घेऊन दारू समजून ती प्यायली. अनेक सेलिब्रिटी मंडळींसह चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. रणदीप भंगू एक उत्कृष्ट अभिनेता तर होताच पण त्यासोबत तो उत्कृष्ट कबड्डीपटू ही होता.

Randeep Singh Bhangu Death : प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्याने छोट्या चुकीमुळे गमावला जीव, दारू समजून प्यायला किटकनाशक
Sonakshi- Zaheer Wedding : लग्नानंतर झहीर इक्बालने सोनाक्षी सिन्हाला सर्वांसमोर केलं किस, कुटुंबीयांसमोरच झाला रोमँटिक; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com