Vada Paav Girl And Ranveer Shorey Dispute : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात राडा, वडापाव गर्ल आणि रणवीरमध्ये झालं कडाक्याचं भांडण

Bigg Boss OTT 3 Latest Update : 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांनी एन्ट्री घेताच बिग बॉसने सर्वांना कामाचे वाटप करून दिले. कामाचे वाटप केल्यानंतर घरामध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झाले आहे.
Vada Paav Girl And Ranveer Shorey Dispute
Vada Paav Girl And Ranveer Shorey DisputeSaam Tv

'बिग बॉस ओटीटी ३' ला शुक्रवारपासून शानदार पद्धतीने सुरुवात झाली आहे. ओटीटीच्या तिसऱ्या सीझनचं होस्टिंग अनिल कपूर करणार आहे. सर्व स्पर्धकांनी जोरदार एन्ट्री घेतल्यानंतर बिग बॉसने सर्वांना फोनचं वाटप केलं. त्यासोबतच प्रत्येकाला आपआपले कामंही वाटून दिले. अशातच कामांवरून दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झाले आहे. वडा पाव गर्ल आणि रणवीर शौरी यांच्यात कामावरून वाद झाला आहे.

Vada Paav Girl And Ranveer Shorey Dispute
Sonakshi- Zaheer Reception Videos: सोनाक्षी- झहीरच्या रिसेप्शनला अवघं बॉलिवूड अवतरलं; रेखा, सायरा बानू, काजोल, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी

जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया हँडलवर बिग बॉसचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये वडा पाव गर्ल आणि रणवीर शौरीमध्ये वाद झालेला दिसत आहे. दोघांमध्ये सकाळच्या ब्रेकफास्ट वरून वाद झाला. घरामध्ये शाकाहरी आणि मांसाहरी असे दोन गट पडलेले दिसत आहे. रणवीर शौरी ब्रेकफास्टमध्ये अंडे असावं अशी मागणी करतो. पण या मागणी वडा पाव गर्ल नकार देते. या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत असल्यामुळे ट्रोलर्स यांना ट्रोल करीत आहे.

प्रोमोमध्ये, घरातल्या सर्व स्पर्धकांसमोर रणवीर म्हणतो, "मी जे काही बोलतोय ते सर्वांच्या भल्यासाठीच बोलतोय. सर्वांचीच तब्येत व्यवस्थित रहावी, यासाठी मी प्रयत्न करतो." त्या दोघांच्याही वादात लव कटारियाही उडी घेतो. तो म्हणतो, "इथे तू तुझे नियम नाही लावू शकत. या बिग बॉसच्या गोलात आपण सर्व फसलोय." असं लव कटारिया रणवीरला म्हणाला आहे. सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस ओटीटी ३' ची जोरदार चर्चा होत आहे.

Vada Paav Girl And Ranveer Shorey Dispute
Sonakshi- Zaheer Wedding : लग्नानंतर झहीर इक्बालने सोनाक्षी सिन्हाला सर्वांसमोर केलं किस, कुटुंबीयांसमोरच झाला रोमँटिक; पाहा VIDEO

बिग बॉसच्या घरात टास्कमध्ये एका विषयावर डिबेट केली आहे. त्या कॉम्पिटिशनचा अध्यक्ष दीपक चौरसिया होता. टास्क दरम्यान दोन गट होते. त्यातील एका गटात रणवीर, साई निकेतन आणि सना सुलतान तर दुसऱ्या गटात अरमान, नीरज आणि लव हे सदस्य होते. यांच्यामध्ये कामावरून डिबेट होताना दिसत आहे. त्यासोबतच यावेळी अरमान मालिकवरही अनेकांनी टीका केलेली आहे. तो बिग बॉसच्या घरात त्याच्या दोन बायकांसोबत आलेला आहे. यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

Vada Paav Girl And Ranveer Shorey Dispute
Sonakshi And Zaheer Wedding: 'ही अनोखी गाठ बांधली...'; सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रजिस्टर पद्धतीने केलं लग्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com