Sonakshi- Zaheer Reception Videos: सोनाक्षी- झहीरच्या रिसेप्शनला अवघं बॉलिवूड अवतरलं; रेखा, सायरा बानू, काजोल, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी

Sonakshi- Zaheer Reception Bollywood Celebrities : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे काल रजिस्टर पद्धतीने लग्न झाल्यानंतर मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केले होते.
Sonakshi- Zaheer Reception Videos: सोनाक्षी- झहीरच्या रिसेप्शनला अवघं बॉलिवूड अवतरलं; रेखा, सायरा बानू, काजोल, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी
Sonakshi- Zaheer Reception Bollywood CelebritiesSaam Tv

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे काल घरी रजिस्टर पद्धतीने लग्न पार पडले. त्यानंतर संध्याकाळी दादरच्या बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीने लग्नाला उपस्थिती लावली होती. यावेळी सोनाक्षीसह झहीरच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. साधं सिंपल पण लक्षवेधी लूकने अवघ्या इंडस्ट्रीचे लक्ष वेधले.

Sonakshi- Zaheer Reception Videos: सोनाक्षी- झहीरच्या रिसेप्शनला अवघं बॉलिवूड अवतरलं; रेखा, सायरा बानू, काजोल, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी
Sonakshi- Zaheer Wedding : लग्नानंतर झहीर इक्बालने सोनाक्षी सिन्हाला सर्वांसमोर केलं किस, कुटुंबीयांसमोरच झाला रोमँटिक; पाहा VIDEO

विरल भयानी या पापाराझीने रिसेप्शन पार्टीमधले अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. रिसेप्शन पार्टीमध्ये सोनाक्षीने डार्क रेड कलरची काठापदराची साडी तिने वेअर केला होता. अभिनेत्रीच्या मराठमोळ्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. रेड कलरची काठापदराची साडी, त्यावर गोल्डन वर्क केलेले दिसत आहे. गोल्डन डायमंड ज्वेलरी, केसात गजरा आणि सिंपल हेअर स्टाईल असा तिने लूक केलेला होता. कपाळावर टिकली आणि लूकला साजेसा मेकअप करत तिने आपला संपूर्ण केलेला आहे.

तर झहीरने क्रीम कलरचा कोट, व्हाईट शर्ट आणि पँट असा त्याने लूक केलेला होता. सोनाक्षी आणि झहीर दोघेही रिसेप्शनमध्ये खूपच सुंदर दिसत होते. सोनाक्षी- झहीरने रिसेप्शन व्हेन्यूवर एकमेकांचा हात पकडून एंट्री घेतली आणि पापाराझींना कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या. सध्या दोघांचेही जोरदार कौतुक केले जात असून दोघांनाही नेटकऱ्यांकडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. रिसेप्शन पार्टीसाठी अवघी बॉलिवूड इंडस्ट्री उपस्थित राहिली होती.

Sonakshi- Zaheer Reception Videos: सोनाक्षी- झहीरच्या रिसेप्शनला अवघं बॉलिवूड अवतरलं; रेखा, सायरा बानू, काजोल, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी
Sonakshi And Zaheer Wedding: 'ही अनोखी गाठ बांधली...'; सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रजिस्टर पद्धतीने केलं लग्न

रिसेप्शन पार्टीला सोनाक्षी आणि झहीरचे जवळचे नातेवाईक, अभिनेत्री हेमा कुरेशी, चंकी पांडे, अनिल कपूर, काजोल देवगण, सायरा बानो, रेखा, सलमान खान, सलमानचा बॉडीगार्ड शेरा आणि त्याचा मुलगा, सलमानची बहिण अर्पिता आणि आयुष, रविना टंडन, विद्या बालन आणि तिचे पती सिद्धार्थ रॉय, हनी सिंह, निर्माते आनंद राय, तब्बू, आदिती राव हैदरी आणि तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ, आदित्य रॉय कपूर, अली फजल, रिचा चड्ढा, रणवीर सिंहचे आई- वडील यांच्यासह अनेक सेलिब्रिटी यावेळी लग्नाला उपस्थित होते. मिडिया रिपोर्टनुसार, या रिसेप्शन पार्टीला १००० च्या आसपास लोकांनी उपस्थिती लावली होती.

Sonakshi- Zaheer Reception Videos: सोनाक्षी- झहीरच्या रिसेप्शनला अवघं बॉलिवूड अवतरलं; रेखा, सायरा बानू, काजोल, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी
Aamir Khan: 'महात्मा गांधींच्या विचारांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव', सेवाग्राम आश्रमाला आमिर खानची भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com