Aamir Khan: 'महात्मा गांधींच्या विचारांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव', सेवाग्राम आश्रमाला आमिर खानची भेट

Aamir Khan Visit Mahatma Gandi's Sevagram Ashram: अभिनेता आमिर खान याने आज वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली आहे.
'महात्मा गांधींच्या विचारांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव', सेवाग्राम आश्रमाला आमिर खानची भेट
Aamir Khan Visit Sevagram AshramSaam Tv

चेतन व्यास, साम टीव्ही, वर्धा प्रतिनिधी

जलसंधारणाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेत वर्धा जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या फार्मर कपमध्ये सहभागी शेतकरी व अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आमिर खान याने आज अचानक दौरा केला आहे. अभिनेता आमिर खान यांचा आजचा हा दौरा अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेला होता.

अमीर खान वर्धेत दाखल होताच त्याने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ आयोजित कार्यक्रमात त्याने वर्धा जिल्ह्यातील फार्मर कपमध्ये सहभागी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यानंतर महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात त्याने भेट दिली. आमिर खान सेवाग्राम आश्रमात पोहचताच पावसाला जोरदार सुरवात झाली.

'महात्मा गांधींच्या विचारांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव', सेवाग्राम आश्रमाला आमिर खानची भेट
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding : 'ही अनोखी गाठ बांधली...'; सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रजिस्टर पद्धतीने केलं लग्न

सेवाग्राम येथील भेटीदरम्यान आमिर खान यानेआपल्या जीवनात महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा प्रभाव असून मी पहिल्यांदा सेवाग्रामला आलो आहे. येथे येऊन एक नवीन ऊर्जा मिळाली आहे, असं तो म्हणाला.

आमिर खान याने फार्मर कपमध्ये सहभागी शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी त्याने वर्धेकरांच्या सहभागबद्दल आनंद व्यक्त केला. वर्धा हे संपूर्ण राज्यात मॉडेल जिल्हा आहे. हा दौरा मला शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी होता. म्हणून गोपनीय ठेवण्यात आला, असं त्याने सांगितलं.

'महात्मा गांधींच्या विचारांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव', सेवाग्राम आश्रमाला आमिर खानची भेट
Abhishek Bachchan Purchase New Flat : अभिषेक बच्चनने मुंबईत ४ मोठे फ्लॅटसह का खरेदी केले 252 स्वेअर फूटचे दोन अपार्टमेंट? बॉलिवूडच्या गुरूचं काय आहे लॉजिक

दरम्यान, आमिर खान अचानक सेवाग्राम आश्रमात पोहचल्याने काही वेळ तेथे आलेले पर्यटक सुद्धा अवाक झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्यासह पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com