Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan ची बिग बजेट साऊथ चित्रपटात एन्ट्री, 'या' सुपरस्टारसोबत करणार स्क्रिन शेअर

Toxic Movie: शाहरुख खानच्या हाती साऊथ चित्रपट (South Film) लागला आहे. शाहरु खान लवकरच साऊथ सुपरस्टार यशसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 'टॉक्सिक' चित्रपटामध्ये (Toxic Movie) हे दोघेही एकत्र दिसणार असल्याचे कळताच दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Priya More

Shah Rukh Khan Tollywood Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) २०२३ मध्ये एकापाठोपाठ ३ सुपरहिट चित्रपट दिले. शाहरुख खानच्या 'पठान', 'जवान' आणि 'डंकी' या ३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत बक्कळ कमाई केली. आता २०२४ मध्ये देखील शाहरुख खान नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अशामध्ये शाहरुख खानच्या हाती साऊथ चित्रपट (South Film) लागला आहे. शाहरु खान लवकरच साऊथ सुपरस्टार यशसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 'टॉक्सिक' चित्रपटामध्ये (Toxic Movie) हे दोघेही एकत्र दिसणार असल्याचे कळताच दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

साऊथचा सुपरस्टार यश त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्याच्या तयारीत आहे. यशच्या 'KGF 2' नंतर चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'टॉक्सिक' या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून त्याला खूप पसंती मिळत आहे. आता 'टॉक्सिक' चित्रपटातून बॉलिवूडचा सुपरस्टार एन्ट्री करणार असल्याची बातमी समोर येत आहे. 'टॉक्सिक' या चित्रपटात यशसोबत शाहरुख खान दिसणार आहे.

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. 'टॉक्सिक' चित्रपटाशी संबंधित नवनवीन अपडेट्स एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटात एन्ट्री करू शकतो. 'टॉक्सिक' चित्रपटाचे निर्माते याबाबत शाहरुख खानशी बोलण्यात व्यस्त आहेत. निर्माते शाहरुख खानच्या उत्तराची वाट पाहत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान कॅमिओ करू शकतो, असे सांगण्यात आले आहे. आता किंग खान या भूमिकेला होकार देतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नुकताच, शाहरुख खान आणि यश यांच्याबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये अशे सांगण्यात आले आहे की, हे दोन्ही सुपरस्टार एका ॲक्शन चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मात्र नंतर यशच्या जवळच्या सूत्रांनी या वृत्ताचे खंडन केले. 'टॉक्सिक' या चित्रपटापूर्वी शाहरुख खानचे नाव अनेक चित्रपटांशी जोडले गेले होते. मात्र त्यापैकी कोणत्याच चित्रपटाबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना

Lalbaugcha Raja Darshan: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाबंच लांब रांगा, भाविकांनी रात्र रस्त्यावर बसून काढली, VIDEO

Sayali Sanjeev: सायली संजीवच्या भाचीचं नाव काय?

Pune : 'ड्राय डे’ला मध्यवर्ती भागात दारू विक्री; मटका किंगसह तिघांवर गुन्हा, लाखोंचा साठा जप्त

Manoj Jarange Morcha: मराठा मोर्चादरम्यान दुर्दैवी घटना, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT