Sridevi मृत्यू प्रकरणात CBI ने युट्यूबरविरोधात दाखल केली चार्जशीट, PM मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या खोट्या सह्यांचा वापर

Sridevi Death Case: मुंबईतील वकील चांदनी शाह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मागच्या वर्षी केंद्रीय सीबीआयने भुवनेश्वर येथे राहणाऱ्या दीप्ती आर पिन्नीती आणि तिचे वकील भरत सुरेश कामथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
Sridevi Death Case
Sridevi Death CaseSaam Tv
Published On

CBI Filed Chargesheet Against Youtuber :

बॉलिवूडची (Bollywood) दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यू प्रकरणात (Sridevi Death Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी सीबीआयने (CBI) युट्यूबरविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. याप्रकरणाचा सीबीआय कसून तपास करत आहे. या युट्यूबरने याप्रकरणामध्ये पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांच्या खोट्या पत्रांचा वापर केला होता. या पत्रांवर पीएम मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या खोट्या सह्या होत्या. या युट्यूबरने आपल्या व्हिडीओमध्ये दाव्याचे समर्थन करण्यासाठी हे कृत्य केले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईतील वकील चांदनी शाह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मागच्या वर्षी केंद्रीय सीबीआयने भुवनेश्वर येथे राहणाऱ्या दीप्ती आर पिन्नीती आणि तिचे वकील भरत सुरेश कामथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण पंतप्रधान कार्यालयाने एजन्सीला पाठवले होते. चांदनी शाह यांनी आरोप केला आहे की, पिन्नितीने पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची पत्रे, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई सरकारच्या रेकॉर्डसह अनेक दस्तऐवज तयार केले. जे बनावट असल्याचे दिसून आले. श्रीदेवी आणि सुशांत सिंग राजपूत यांसारख्या बॉलीवूड कलाकारांच्या मृत्यू प्रकरणांच्या सोशल मीडियाच्या चर्चेत पिन्निती सक्रिय सहभागी आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईमध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले. श्रीदेवीच्या मृत्यूबाबत पिन्नीतीने स्वत: केलेल्या तपासाच्या आधारे एका मुलाखतीत 'दोन सरकारांमधील कव्हर अप' यासह खळबळजनक दावे केले होते. पीटीआयच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पिन्नितीने सांगितले की, 'सीबीआयने माझे म्हणणे न नोंदवता माझ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे... आरोप निश्चित झाल्यावर पुरावे न्यायालयाला दिले जातील. प्रश्नातील पत्रांमध्ये सीबीआय ज्या अधिकाऱ्यांखाली येते त्याच अधिकाऱ्यांवर आरोप करतात. त्यामुळे पुरावे गोळा करण्याची जबाबदारी एजन्सीवर सोपवणे हा हितसंबंधांचा संघर्ष आहे.

Sridevi Death Case
Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पांढरी साडीच का नेसायच्या?

गेल्या वर्षी पिन्नितीच्या विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने 2 डिसेंबर रोजी भुवनेश्वर येथील त्याच्या निवासस्थानी झडती घेतली होती. त्यावेळी सीबीआयने फोन आणि लॅपटॉपसह डिजिटल उपकरणे जप्त केली होती. विशेष न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सीबीआयच्या अहवालानुसार, यूट्यूबवर झालेल्या चर्चेदरम्यान पिन्नीतीने पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांची सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे.

एजन्सीने पिन्निती आणि कामथ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार १२०-बी, ४६५, ४६९ आणि ४७१ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईच्या वकील चांदनी शाह यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला होता की, 'संशयित दीप्ती पिन्नीतीने श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी सरकारवर वारंवार विचित्र आरोप करून विद्यमान सरकारची प्रतिमा मलिन केली आहे.'

Sridevi Death Case
Fighter Vs Hanuman Box Office Collection: 200 कोटींजवळ पोहचला 'हनुमान', 'फायटर' 12 व्या दिवशीही लढण्यात अपयशी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com