Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पांढरी साडीच का नेसायच्या?

Lata Mangeshkar Songs: लता मंगेशकर यांना सीगीताची राणी म्हणून देखील ओळखले जात होते. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशामध्ये देखील लता मंगेशकर यांचा मोठा चाहतावर्ग होता. ७० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ५० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSaam Tv
Published On

Lata Mangeshkar Death Anniversary:

भारताची गान कोकिळा आणि गानसम्राज्ञी अशी ओळख असणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. लता मंगेशकर या आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये जिवंत आहेत. लता मंगेशकर यांना सीगीताची राणी म्हणून देखील ओळखले जात होते. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशामध्ये देखील लता मंगेशकर यांचा मोठा चाहतावर्ग होता. ७० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ५० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. फक्त मराठी, हिंदीच नाही तर ३० पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर येथे प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून संगीताचे धडे मिळाले. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांना सहा विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले होते. अशा या सर्वांच्या लाडक्या लतादीदींबद्दल आज आपण कोणलाच न माहिती असलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत...

लतादीदींना कॉटनच्या साड्या खूप आवडत होत्या. त्यांनी नेहमी रंगीबेरंगी साड्यांऐवजी पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसणे पसंत केले. पांढऱ्या रंगाची साडी नेसण्यामागे त्यांचे कारण वेगळेच होते. त्या अशा म्हणायच्या की, पांढरा रंग माझ्या व्यक्तिमत्त्वाला चांगला शोभतो आणि लोक पांढऱ्या साडीतही चांगले दिसतात. त्यांच्यासोबत एक असा किस्सा घडला होता की, मुंबईत एकदा मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हा रेकॉर्डिंगसाठी काय घालून जावे हे लता दीदींना समजत नव्हते. काही विचार केल्यानंतर त्यांनी क्रेप शिफॉन साडी नेसली. ती साडी पिवळ्या किंवा केशरी रंगाची होती.

Lata Mangeshkar
Fighter Vs Hanuman Box Office Collection: 200 कोटींजवळ पोहचला 'हनुमान', 'फायटर' 12 व्या दिवशीही लढण्यात अपयशी

लतादीदी स्टुडिओत पोहोचल्यावर त्याची साडी पाहून रेकॉर्डिस्टने विचारले की, 'काय घातले आहेस?' लतादीदींनी त्यांना सांगितले की, मी इतक्या पावसात भिजून आले आहे. क्रेपच्या साडीवर पाणी लवकर सुकते. पण कॉटनमध्ये असे होत नाही. म्हणून मला हे घालावे लागले. यावर रेकॉर्डिस्ट म्हणाला होता की, हे तुम्हाला अजिबात शोभत नाही. या घटनेनंतर लतादीदींना समजले की, लोकांना त्यांना फक्त पांढऱ्या साडीतच पाहायला आवडते. त्यामुळे त्यांनी रंगीबेरंगी साड्यांपासून स्वतःला दूर केले.

Lata Mangeshkar
Nora Fatehi Birthday: नोरा फतेहीने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दिले डान्सचे धडे; अभिनेत्रीबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का ?

लता मंगेशकर यांनी लग्न केले नव्हते. त्यांनी लग्न का केले नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण त्यांनी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे लग्न केले नाही. अगदी लहान वयातच घरच्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊन पडल्या. त्यामुळेच त्यांनी लग्नाचा विचारही केला नाही. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि भावंडांची काळजी घेतली. कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता लता मंगेशकर यांना स्वतःसाठी वेळ मिळू शकला नाही.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar Death Anniversary: लता मंगेशकर यांचं पहिलं गाणं कधीच रिलीज झालं नाही; काय होतं त्यामागचं कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com