Fighter Vs Hanuman Box Office Collection: 200 कोटींजवळ पोहचला 'हनुमान', 'फायटर' 12 व्या दिवशीही लढण्यात अपयशी

Fighter Box Office Collection: हनुमानची २०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल सुरू आहे. तर फायटरने १२ व्या दिवशी खूपच कमी कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली हे आपण पाहणार आहोत.
Fighter Vs Hanuman Box Office Collection
Fighter Vs Hanuman Box Office CollectionSaam Tv
Published On

Hanuman Box Office Collection:

जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत नाही. या चित्रपटांमध्ये बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पदुकोन (Deepika Padukone) यांचा 'फायटर' चित्रपट (Fighter Movie) तर साऊथ अभिनेता तेजा सज्जाचा 'हनुमान' चित्रपटांचा (Hanuman Movie) समावेश आहे. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर सुरू आहे. तरी देखील कमाईच्या बाबतीत दोन्ही चित्रपट मागे पडले आहेत. हनुमानची २०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल सुरू आहे. तर फायटरने १२ व्या दिवशी खूपच कमी कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली हे आपण पाहणार आहोत.

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोन स्टारर फायटर चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीपासून हळूहळू कमाई करत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाला रिलीजच्या दिवशी प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाने चांगली सुरूवात केली. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या चित्रपटाने 22.5 कोटींची ओपनिंग केली. चांगल्या सुरुवातीनंतर आता फायटरची क्रेझ प्रेक्षकांच्या मनातून ओसरताना दिसत आहे.

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटर हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईत सतत चढ-उतार होताना दिसत आहे. 'फायटर'ने 12 व्या दिवशी 3.35 कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाने आतापर्यंत 178.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तेजा सज्जाच्या 'हनुमान'ला रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे जबरदस्त कलेक्शन पाहून निर्मात्यांनी त्याचा सिक्वेलही जाहीर केला आहे. रिलीजच्या 19 व्या दिवसानंतरही हनुमान चित्रपटगृहांमध्ये चालू आहे आणि अजूनही प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा मिळवत आहे.

चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, तेजा सज्जाच्या 'हनुमान'ने २४ व्या दिवशी ९३ लाखांचा व्यवसाय केला आहे. 189.58 कोटी रुपये जमा झाले आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट एवढा आवडला आहे की, सध्या हनुमान चित्रपट पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर गर्दी जमवण्यात यशस्वी होत आहे. येत्या काही दिवसामध्ये हा चित्रपट आणखी चांगली कमाई करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Fighter Vs Hanuman Box Office Collection
Lata Mangeshkar Death Anniversary: लता मंगेशकर यांचं पहिलं गाणं कधीच रिलीज झालं नाही; काय होतं त्यामागचं कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com