'पठाण' (Pathan) आणि 'जवान'च्या (Jawan Movie) ब्लॉकबस्टर यशानंतर आता बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पठान' आणि 'जवान'नंतर आता 'डंकी' (Dunki Movie) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे.
2 नोव्हेंबरला शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त 'डिंकी'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. हा टीझर पाहून शाहरूखच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. अशामध्ये आता निर्मात्यांनी 'डंकी'चे पहिले गाणं (Dunki First Song Out) 'लुट पुट गया' रिलीज केले आहे. या गाण्यामध्ये शाहरुख खान तापसी पन्नूसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या गाण्याला अवघ्या काही मिनिटांमध्येच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शाहरुख खान, तापसी पन्नू आणि विकी कौशल स्टारर 'डंकी' चित्रपटातील पहिलं गाणं 'लुट पुट गया' हे आज रिलीज करण्यात आले. या गाण्यामध्ये शाहरुख खान कार्गो पँट आणि स्काय ब्लू कलरच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर तापसी पन्नू सलवार सूटमध्ये म्हणजेच देसी लूकमध्ये दिसत आहे. या गाण्यामध्ये शाहरुख खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. शाहरुखने या डान्सच्या माध्यमातूनच पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
'लुट पुट गया' हे गाणं अरिजित सिंगने गायलं आहे. या गाण्याचे म्युजिक डायरेक्टर प्रितम आहे. हे गाणं स्वानंद किरकिरे आणि आयपी सिंह यांनी लिहिले आहेत. तर हे गाणं प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केले आहे. ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 21 डिसेंबरला 'डिंकी' चित्रपट रिलीज होणार आहे.
बॉक्स ऑफिसवर 'डंकी' चित्रपटाची टक्कर प्रभासच्या 'सालार'शी होणार आहे.'डिंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरूख खान, तापसी पन्नू आणि विकी कौशल यांच्यासोबत बोमन इराणी देखील मुख्य भूमिकेत आहेत. 'डिंकी' चित्रपट बेकायदेशीर इमिग्रेशनपासून प्रेरित असून बेकायदेशीरपणे परदेशात प्रवास करणाऱ्या व्यक्तींची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.