Saif Ali Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan: सैफ अली खानच्या खांदा आणि गुडघ्यावर सर्जरी, अभिनेत्याने स्वत:च दिले हेल्थ अपडेट...

Saif Ali Khan Health Update: सैफ अली खानला एका चित्रपटाच्या सेटवर ही दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी त्याची पत्नी करीना कपूर खान देखील त्याच्यासोबत होती.

Priya More

Saif Ali Khan Shoulder And Knee Factures:

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) सैफ अली खानच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अभिनेत्याच्या खांद्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता अभिनेत्याची प्रकृती चांगली असून त्याने स्वत:च आपल्या चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानला एका चित्रपटाच्या सेटवर ही दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी त्याची पत्नी करीना कपूर खान देखील त्याच्यासोबत होती. सैफला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आले होते. त्याच्या हेल्थचे अपडेट जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत होते. अखेर सैफनेच आपल्या चाहत्यांना हेल्थ अपडेट्स दिले आहेत.

आपल्या शस्त्रक्रियेनंतर मीडिया हाऊसशी बोलताना सैफ अली खानने सांगितले की, 'आपण जे काही करतो ते दुखापती आणि शस्त्रक्रियेचे परिणाम आहेत. डॉक्टरांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी आनंदी आहे आणि सर्व हितचिंतकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.' अभिनेत्याने डॉक्टरांचे देखील आभार मानले. त्याने पुढे सांगितले की, 'मी अशी कमालीची शस्त्रक्रिया केलेल्या हातांना मिळवून खूपच आनंदी आहे.'

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, सैफच्या गुडघ्याला आणि खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. खान कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने अभिनेत्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सैफ अली खान सध्या साऊथ चित्रपट 'देवरा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या या चित्रपटात तो 'बहिरा'ची भूमिका साकारत आहे. सैफ अली खान शूटिंगदरम्यानच जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर उपचारासाठी त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सैफ अली खानसोबत चित्रपटाच्या सेटवर असा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2016 मध्ये 'रंगून' चित्रपटाच्या सेटवरही त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतरही त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याच्या अंगठ्यावर छोटी सर्जरी करण्यात आली होती. त्यासोबतच 'क्या कहना' चित्रपटातील एका सीनदरम्यान बाईक स्टंट करताना सैफ जखमी झाला होता. खंडाळ्यामध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. पाऊस असल्याने शूटिंगच्या ठिकाणी खूप चिखल होता. अशामध्ये बाइकवर स्टंट करताना सैफ पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि 100 टाके पडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT