Uorfi Javed : राम भक्तीत तल्लीन झाली उर्फी जावेद, श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घरामध्ये केलं यज्ञ

Uorfi Javed Holds Hawan At Home: उर्फीने तिच्या घरामध्ये यज्ञ केले आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून उर्फीचे कौतुक केले जात आहे.
uorfi javed do hawan at home
uorfi javed do hawan at homeInstagram
Published On

Uorfi Javed Video:

आपल्या अतरंगी आणि हटके फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमी चर्चेत असते. यावेळी उर्फी जावेद तिच्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत आली नाही तर ती चर्चेत येण्यामागचे कारण जरा वेगळेच आहे. उर्फी जावेदचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्फी जावेद सध्या राम भक्तीमध्ये तल्लीन झाली आहे. उर्फीने तिच्या घरामध्ये यज्ञ केले आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून उर्फीचे कौतुक केले जात आहे.

सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे. आज अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे. संपूर्ण देशाचे या सोहळ्याकडे लक्ष आहे. देशभरामध्ये रामभक्तांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने श्रीरामांची पूजा करत आहेत. अशामध्ये उर्फी जावेद देखील श्रीरामांच्या भक्तीमध्ये बुडाली आहे. अयोध्येमध्ये श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरू असताना उर्फी जावेद तिच्या घरामध्ये यज्ञ केले.

उर्फी जावेदने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फीने नेव्ही ब्ल्यू कलरचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या घरामध्ये यज्ञ करण्यात आले आहे. दोन पंडीत त्याठिकाणी बसलेले दिसत आहे. यज्ञामध्ये उर्फी तूप टाकताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला स्वाती मिश्रा यांचे 'राम आयेंगे...' हे गाणं ऐकायला मिळत आहे. उर्फी जावेदने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'Congratulations to everyone celebrating!', असे लिहिले आहे.

uorfi javed do hawan at home
Saif Ali Khan: सैफ अली खान कोकीलाबेन रुग्णालयात दाखल, गुडघा आणि खांद्यांवर शस्त्रक्रिया; नेमकं काय घडलं?

उर्फी जावेदला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी यज्ञ करताना पाहून तिच्या चाहत्यांनी कौतुक केले आहे. तर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. एका युजरने लिहिले की, 'रिलॅक्स मुलांनो, ती मुस्लिम नव्हती.' दुसर्‍या युजरने कमेंट्स करत लिहिले की,'जसे उर्फी प्रत्येक धर्माचे समर्थन करते, आपणही तेच केले पाहिजे.' तर इतर युजर्सने लिहिले की, 'ती खूप दयाळू आहे आणि प्रत्येक धर्माचा आदर करते.' उर्फी जावेदच्या या व्हिडीओला 1 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

uorfi javed do hawan at home
Swargandharv Sudhir Phadke: माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात..., 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा टीझर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com