Nawazuddin Siddiqui Avneet Kiss Controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui Avneet Kiss Controversy: २८ वर्षांनी लहान अवनीत कौरला केलं किस, ट्रोल झाल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला...

२८ वर्षांनी लहान हिरोईनसोबतच्या 'किसिंग' सीनमुळे ट्रोल, नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, नव्या पिढीतले हिरो 'युजलेस', म्हणून..

साम टिव्ही ब्युरो

Nawazuddin Siddiqui Avneet Kiss Controversy: पडद्यावरची भूमिका अभिनयामुळं जिवंत करणारा आणि ती जगणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी एका किसिंग सीनमुळं ट्रॉलर्सच्या कचाट्यात सापडला आहे. आगामी चित्रपट 'टिकू वेड्स शेरू'मध्ये (Tiku Weds Sheru) नवाजुद्दीन आणि त्याच्यापेक्षा वयाने २८ वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) यांचा लिपलॉक सीन आहे. या सीनमुळं त्याच्यावर टीका होत आहे. यावर आता नवाजुद्दीनचं ट्रॉलर्सला चांगलंच उत्तर दिलं आहे.

'बजरंगी भाईजान'मधील चांद नवाबच्या भूमिकेमुळं नवाजुद्दीन सिद्दिकी प्रसिद्धीझोतात आला होता. त्याच्या अभिनयाची चर्चा तर होतेच, पण वैवाहिक आयुष्यामुळंही तो इंडस्ट्रीमध्ये चर्चेत आहे. त्यात आता 'टिकू वेड्स शेरू' या त्याच्या नव्या चित्रपटामुळं चर्चेला फोडणी मिळाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यातील एका सीनमुळं नवाजुद्दीनवर ट्रोलर्सची धाड पडलीय.

कंगना रणौत निर्मित 'टीकू वेड्स शेरू' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात ४९ वर्षीय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि २१ वर्षीय अवनीत कौर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या कास्टिंगवरूनच चित्रपटाला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. नवाजुद्दीन आणि अवनीतचा लिपलॉक सीन आहे. या सीनमुळे नवाजुद्दीनवर प्रेक्षकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यावर पहिल्यांदाच नवाजुद्दीननं भाष्य केलंय. (Latest Marathi News)

'टिकू वेड्स शेरू' चित्रपटाच्या ट्रेलरमधील लिपलॉक सीनमुळे नेटकऱ्यांनी नवाजुद्दीनवर टीकेचा भडीमार केला आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने त्यावर मौन सोडले. 'रोमान्सला वय नसतं, असं सांगत त्यानं किंग खान शाहरूखचं उदाहरणही दिलं.

'तरुणांमध्येच रोमान्स उरला नाही'

नवाजुद्दीननं किसिंग सीनवर तोंडसुख घेणाऱ्या नेटकऱ्यांना आणि तरुण पिढीला खडेबोल सुनावले. तो म्हणाला, "रोमान्सला वय नसतं. प्रॉब्लेम असा आहे की, तरूण मुलांमध्ये रोमान्स उरलेला नाही. आमच्या काळातील रोमान्स हा वेगळाच होता. आम्ही प्रेमाच्या वाटेवर चालत राहू आणि सगळ्यांना प्रेम वाटत राहू. पुढील अनेक वर्षे प्रेम करत राहू. आजही शाहरुख खानला रोमँटिक भूमिका करायला मिळतात. कारण आजची पिढी 'युजलेस' आहे. त्यांना रोमान्सबद्दल काहीच कळत नाही". आजकाल सर्व व्हाट्सअॅपवर होतं. प्रेम आणि ब्रेकअपही व्हॉट्सअॅपवर होतं. याला काहीच अर्थ नाही. जे लोक रोमान्स प्रत्यक्षात जगतात तेच तो करू शकतात. ते दुसरं कोणाला जमणार नाही, असंही तो म्हणाला.

कंगना रणौत निर्मित 'टीकू वेड्स शेरू' या चित्रपटात नवाजुद्दीनने ज्युनिअर आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. त्याला पुढे जाऊन सुपरस्टार व्हायचे आहे. तर अवनीत महत्त्वाकांक्षी मुलीच्या भूमिकेत आहे. दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व, पण स्वप्न एकच असणाऱ्या कपलची लव्ह स्टोरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT